” न्याय आणि शांतीसाठी वाटचाल “या विषयवार आधारित राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे थाटात उद्धघाटन
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
कोराडी– राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमीत्त “न्याय आणि शांतीसाठी वाटचाल या संकल्पनेवर आधारित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर अंतर्गत तायवाडे महाविद्यालय महादूला-कोराडी व बॅ.शेषराव वानखेडे महाविद्यालय खापरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने आठदिवसिय राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे थाटात उद् घाटन संपन्न झाले.या शिबीरात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विद्यापीठातून सूमारे ४५० विद्यार्थी सहभागी झाले आहे. या शिबिराचे उद् घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर चे प्र कूलगूरू डॉ.विनायकराव देशपांडे यांच्या हस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अॅड.श्रीकांत पांडे,(सचिव व कोषाध्यक्ष),श्रीक्षेत्र गणपती देवस्थान आदासा, प्रमुख अतिथी व वक्ते म्हणुन जेष्ठ पत्रकार व शेतकरी नेते मा.चंद्रकांत वानखडे,डॉ.बबनराव तायवाडे अध्यक्ष श्री सच्चिदानंद शिक्षण संस्था नागपूर हे उपस्थित होते.या शिबीराच्या उद् घाटनप्रसंगी मा.श्री मनोहरजी कूंभारे ,उपाध्यक्ष ,जिल्हा परिषद नागपूर ,मा.बाबाराव कोढे अध्यक्ष तालुका खरेदी विक्री संघ कळमेश्वर,मा.श्री जयवंतराव मुलमुले,श्री महेन्द्र डोगंरे सदस्य जिल्हा परिषद सदस्य धापेवाडा सर्कल,मा .श्री.श्रावणदादा भिगांरे,सभापती ,पंचायत समीती कळमेश्वर, मा.श्री .दिपक कोल्हे,विश्वस्त,श्रीक्षेत्र गणपती देवस्थान आदासा, मा.चेतनजी निबांळकर,सरपंच,आदासा- सोनपूर ,मा.राजेशजी शेटे,उपसरपंच,आदासा सोनपूर ,तायवाडे महाविद्यालय महादूला-कोराडी येथील प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे व बॅ. शेषराव वानखेडे महाविद्यालय खापरखेडाचे प्राचार्य डॉ.आर.जी.टाले इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.या उद् घाटनपर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे यांनी केले त्यांनी आपल्या वक्तव्यातून राष्ट्रचेतना आणि राष्ट्रभक्ती मनात घेवून इथला शिबीरार्थी ज्ञानोपासक होत असल्याचे दिसते. विश्वव्यापक प्रेमाची संकल्पना येथे रूजविली जाते. या कार्यक्रमाचे उद् घाटक डॉ.विनायक देशपांडे यांनी गांधीजीच्या विचारांचा थोडक्यात आढावा घेतला.हिसेंला अहिसेंने उत्तर देण्याचे धाडस गांधींनी केले.न्याय आणि शांती त्यांच्या जीवनाचा स्थायी भाव होता,असे त्यांनी आपल्या वक्तव्यातून सांगितले.या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री.चंद्रकांत वानखेडे यांनी गांधीजीच्या विचारांचे आजच्या काळात असणारे महत्व सागंत असतांना गांधीजीनी वर्णवर्चस्ववादाची चौकट मोडली म्हणून गांधींजीची हत्या झाली असे विधान केले.गांधीजीमुळे सर्व सामान्य शेतकर्याला१९१६ साली कॉग्रेसच्या व्यासपिठावर बसण्याचा मान मिळाला.गांधींजी ही तत्वप्रणाली असून तिचा आज स्विकार करण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी आपल्या वक्तव्यातून सांगितले.यानंतर दूसरे अतिथी डॉ.बबनराव तायवाडे यांनी बोलतांना गांधीजीच्या विचारांचा जगाने स्विकार केला आहे,नेल्सन मंडेला यांनी देखील गांधीजींच्या विचारांचा पुरस्कार करून दक्षिण आफ्रीकेत स्वातंत्र्य व समतेची ज्योत पेटविली.गांधीजी इंग्रजांशी निशस्त्रपणे लढले.यातून त्याच्या अहिंसा तत्वाचे बळ लक्षात येते ,असे त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.आपल्या अध्यक्षीय भाषणातून अॅड.श्रीकांत पांडे यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे अनन्य साधारण महत्व प्रतिपादन केले,अशा शिबीरातून वयक्तिक विकास आणि सार्वत्रिक नेतृत्व तयार होते .याशिवाय पूस्तकी ज्ञानाबरोबर सामाजिक सहजीवनाचा व समरसतेचा अनूभव येतो,असे म्हटले
सूत्रसंचालन डॉ.वर्षा वैद्य यांनी तर आभार डॉ.ज्योती सेलूकर यांनी मानले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यात तायवाडे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ.किशोर घोरमाडे, सहकारी डॉ.शरद डवरे डॉ.वकील शेख प्रा.सूनिल घुगल ,बॅ.शेषराव वानखडे महाविद्यालय खापरखेडा येथील राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ.राजू राऊत,सहकारी डॉ.उमेश जनबंधू,धनवटे नॅशनल कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ.राजू गोसावी,सहकारी ,प्रा.रवी गूंडे,राजे धर्मराव महाविद्यालय आलापल्ली येथील कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रकाश सोनूले या सर्वांनी सहकार्य केले.या शिबीराच्या उद् घाटन समारंभात दोन्ही महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले.