*युवकांनी सत्‍यावर आधारित ज्ञानार्जन करावे – नीलेश भरणे*

*युवकांनी सत्‍यावर आधारित ज्ञानार्जन करावे नीलेश भरणे*

 

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

कोराडीतायवाडे महाविद्यालय महादूला- कोराडी आणि बॕ.शेषराव वानखेडेमहाविद्‍यालय खापरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर आदासा येथे दि.०८/०२/२०२० ते १४/०२/२०२० पर्यंत आयोजित करण्यात आले आहे . या शिबिरात दि.०९/०२/२०२० ला रविवारला “व्‍यवसाय मार्गदर्शन “याविषयावर व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले.या विषयावर मार्गदर्शन करण्‍यासाठी श्री.निलेशजी भरणे,गुन्‍हे शाखेचे अप्‍पर पोलिस आयुक्‍त हे प्रमुख अतिथी म्‍हणून उपस्‍थित होते.त्यांनी आपल्‍या मार्गदर्शन पर भाषणातून असे म्‍हटले की विद्यार्थ्यानी प्रथम आपल्‍या कॅरीयरसाठी आपले उद्‍दिष्‍ट निश्‍चित करायला पाहिजे,व त्‍यानतंर आपला व्‍यवसाय किंवा नोकरीची निवड करावी.स्‍पर्धापरीक्षांना समोर जातांना आपण भाषा,सामान्‍यज्ञान,गणित,विज्ञान,करंट अफेअर,सामाजिक शास्‍त्रे यांचा सखोल अभ्‍यास करावा व सत्‍यावर आधारीत ज्ञान प्राप्‍त करण्‍याचा प्रयत्‍न करावा ,असे मत माडंले.या कार्यक्रमाप्रसंगी कॉग्रेसचे प्रवक्‍ता श्री.अतूलजी लोंढे यांनीसूध्‍दा विद्‍यार्थ्‍यांना सामाजिक समस्‍या याविषयावर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाप्रसंगी डॉ.बबनराव तायवाडे, अध्‍यक्ष श्री सच्‍चिदानंद शिक्षण संस्‍था नागपूर ,प्राचार्य डॉ.शरयू तायवाडे , तायवाडे महाविद्‍यालय महादूला ,प्राचार्य डॉ.रामकृष्‍ण टाले बॅ.शेषराव वानखडे महाविद्‍यालय खापरखेडा ई.मान्‍यवर मंचावर उपस्‍थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु.शुभांगी वर्‍हाडे हिने केले. हा कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी,डॉ.किशोर घोडमारे,डॉ.शरद डवरे,डॉ.राजेन्‍द्र राऊत डॉ राजीवगिरी गोसावी ,डॉ.प्रेरणा थोरात.प्रा.सुनिल घुगल,डॉ.संगिता उमाळे यांनी प्रयत्‍न केले.या कार्यक्रमाला राष्‍ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्‍वय:सेवक उपस्‍थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …