*सावनेर येथे हिंगणघाट पिडीतेला श्रद्धांजली*
*दोषीला फाशी व मु्तात्मेस चिर शांती करीता कैंडल मार्च*
*प्रतिनिधी सुरज सेलकर सावनेर*
*नगरातील सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊण हिंगणघाटच्या दुर्देवी प्रकरणाचा निषेध केला व सरकार ला विनंती करून दोशीला फाशी च झालीच पाहिजे अशी मागणी केली*
*सावनेर – हिंगणघाट येथील पीडित तरुणीचा मृत्यू झाल्याबद्दल देशभरातून दुःख व्यक्त होत असून निषेध नोंदविल्या जात आहे. समाजमन सुन्न करणाऱ्या या घटने संदर्भात सावनेर येथील नागरिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करुन आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली आहे.*
*हिंगणघाट येथील पिडीत तरुणीने सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर या तरुणीची प्राणज्योत मालवली. तिला वाचवण्यासाठी राज्य शासन व तज्ञ डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले , परंतू काळाने घाला घातला व आज पीडीता आपल्यात नसल्याची हळहळ सर्वत्र व्यक्त होत असुन जलदगती न्यायालयात सदर प्रकरण लावून लवकरात लवकर सदर प्रकरण निकाली लावन्याची मागणी सर्व स्तरावरुन होत आहे त्याच अनुशंगाने माजी नगराध्यक्ष व शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष पवन जैस्वाल,व्यापारी संघ सावनेर चे अध्यक्ष विनोद जैन,वरिष्ठ समाजसेवी डोमासाव सावजी,युवा नेते मनोज बसवार आदिंच्या पुढाकाराने सामुहीक श्रध्दांजली व आंबेडकर पुतळा बस स्थानक ते गांधी पुतळा असे कँडल मार्च चे आयोजन करण्यात आले त्यात शेकडो नागरिकांनी भाग घेऊण आपल्या सहवेदना प्रकट करत मु्तात्म्यास श्रध्दांजली वाहली*
*वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे मृत्यू शी झुंज घेत असलेली तरुणीने 10 तरीखेला सकाळी अखेरचा स्वास घेतला हे खूप दुर्दैवी घटना असून संपूर्ण भारतात त्याचा निषेध होत असुन सावनेर येथे ही असेच जण आक्रोश निर्माण झाले पीडितेला न्याय मिळावा व आरोपीला कठोर शिक्षा व्हावी व असे कृत्य पुन्हा घडूनये व कोणत्याही महिलेवर अश्या प्रकारचे कृत्य घडू नये,महिला सुरक्षा व घटीत अश्या दुर्दैवी घटना भविष्यात घडू नये करिता कठोर कायदे स्थापित करुण समाज कंटकांचे मुसके आवरण्याकरिता उपाय योजना आखण्याची मागणी सह दोषीला तात्काळ फाशीची शिक्षा मीळावी अशी याप्रसंगी करण्यात मागणी करण्यात आली*
*श्रद्धांजली व कँन्डल मार्च च्या आयोजनात नगरसेवक व गट नेते सुनील चाफेकर,नगरसेवक दिपक बसवार,निलेश पटे,शपीक सैय्यद,माजी नगर सेवक लक्ष्मीकांत दिवटे,गोपाल घटे,अश्वीन कारोकार,विजय तिडके,चंदु कामदार,विजय कुहिटे,प्रा.विजय टेकाडे,नरेंद्र वाघेला,सुमुख लाखानी,प्रमोद नाईक,रमेश घटे,इमरान शाह,अजय डाखोळे आदिं सह शेकडो युवकांनी सहभाग घेतला*
*याप्रसंगी निर्भया अमर रहे,दोषीला तात्काळ फाशी झालीच पाहिजे अश्या घोषणा करत महात्मा गांधींच्या पुतळ्या समोर जळत्या पणत्या ठेवून दोन मीनीट मौन पाळून पीडितेच्या आत्मेस चिर शांती प्राप्ती करिता सामुहीक प्रार्थना करण्यात आली*