*युवकांना ग्राम संस्कृतीचे दर्शन घडविणे आवश्यक : ना.सुनिल केदार*
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*
कोराडी-तायवाडे महाविद्यालय महादूला- कोराडी आणि बॕ.शेषराव वानखेडे महाविद्यालय खापरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर आदासा येथे दि.०८/०२/२०२० ते १४/०२/२०२० पर्यंत आयोजित करण्यात आले आहे .
दि.१०/०२/२०२० सोमवारला “सत्य,अहिंसा व न्यायाची जोपासना ” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन मा.सुनीलबाबू केदार , दुग्ध विकासमंत्री आणि युवक कल्याण व क्रीडा मंत्री तसेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ बबनराव तायवाडे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून गांधीजींनी शांतीच्या मार्गाने जे स्वातंत्र्य मिळविले त्याची नोंद जगाने घेतली. स्वातंत्र्यानंतर गांधीजींनी देशाटन करून शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असे सांगितले.आपल्याअध्यक्षीय भाषणात सुनील बांबू केदार यांनी गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि न्याय या तत्त्वावर प्रकाश टाकला. नवीन पिढी ही तंत्रज्ञान युक्त असून जगाचे नेतृत्व करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. युवकांना ग्राम संस्कृती दर्शन घडविणे आणि सहजीवनाबरोबरच कौटुंबिक जबाबदारीचीही जाणिव निर्माण करणे हे दोन्ही हेतु या अशा शिबिरातून साध्य करता येतात असे सुनीलबाबू केदार यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ ज्योती सेलूकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ अंजली पांडे यांनी केले. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ शरयू तायवाडे , प्राचार्य डॉ आर.जी टाले, डॉ.राजेंद्र राऊत, डॉ. किशोर घोडमारे, डॉ राजीवगिरी गोसावी ,डॉ.प्रेरणा थोरात.प्रा.सुनिल घुगल,डॉ.संगिता उमाळे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वय:सेवक उपस्थित होते.
दि.११/०२/२०२०सोमवारला सकाळी प्रार्थनेनतर विद्यार्थ्यानी योगाअभ्यास करून ग्रामस्वच्छता अभियान राबविले,त्यामध्ये स्वच्छतेसोबतच टेकडीच्या खालच्या भागात सावनेर रोडवर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वय:सेवकांनी दोन लघू बंधारे बांधले व ज्यून्या बंधार्याचे पुनरूज्जिवन केले.दूपारच्या सत्राला इंदिरा गांधी महाविद्यालय कळमेश्वर येथील प्रा.राकेश लोहकरे दिग्दर्शित “हुंडाबळी”या नाटीकेचे श्री.जितेन्द्र सावरकर व सूखीनाथ फलके यांच्या चमूने सादरीकरण केले व त्या माध्यमाने समाज जाग्रृती करण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बॅ.शेषराव वानखडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामकृष्ण टाले उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात डॉ.किशोर घोरमाडे,डॉ.वकील शेख,डॉ.शरद डवरे डॉ.राजेंद्र राऊत,डॉ.जनबंधू,डॉ.आसावरी दुर्गे,डॉ.राजीवगिरी गोसावी यांनी सफल प्रयत्न केले.आजच्या सर्व कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वय:सेवकांनी सहभाग घेतला.