राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्ठं गिफ्ट
पाच दिवसांचा आठवडा ठाकरे सरकारकडून मान्य
विशेष प्रतिनिधि
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने मोठं गिफ्ट दिलं आहे. पुढील महिन्यापासून पाच दिवसांचा आठवडा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केला जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय (State Government Five Days Week) घेण्यात आला.
29 फेब्रुवारीपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांच्या आठवड्याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती आहे. त्यासोबतच कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढवले जातील. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना आता दर शनिवार-रविवार हक्काची सुट्टी मिळणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी प्रलंबित होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताच ही मागणी मान्य झाली (State Government Five Days Week) आहे