*सावनेर येथे सर्वेक्षण करण्यास आलेल्या महिला डॉक्टरांचे पथकावर फेकले एँसीड* *पथकातील एक महिला डाँक्टर सोबतच स्थानिक दोघां महिलांच्या आंगावर उडले ऍसिडचे शिंतोडे*

 

*सावनेर येथे सर्वेक्षण करण्यास आलेल्या महिला डॉक्टरांचे पथकावर फेकले एँसीड*

*पथकातील एक महिला डाँक्टर सोबतच स्थानिक दोघां महिलांच्या आंगावर उडले ऍसिडचे शिंतोडे*

*डाँक्टरांच्या मते पिडितांची स्थिती गंभीर नसून सावधते करीता व एँसीड चे परिणाम उशीरा होण्याच्या शक्यतेमुळे नागपुरात हलविन्यात आले*

 

*अतिरिक्त पोलिस अधिक्षक मोनिका राऊत आपल्या ताफ्यासह घटनास्थळी लगेच दाखल*

मुख्य संपादक किशोर ढूंढेले सोबत सावनेर प्रतिनिधि सूरज सेलकर

*सावनेरःहिंगणघाट जळीत प्रकरणाचे दुखः व हदर्यातुन समाजमन सावरण्याच्या प्रयत्नात असतांनाच सावनेर शहरात एका माथेफीरूने नँशनल एँड्स आँर्गनाझेशन (नँको) च्या टीमवर एँसीड हल्ला करुण आपल्या विक्षीप्त मानसिकतेचा परिचय दिला*

*मिळालेल्या माहिती नुसार इंदिरा गांधी मेडिकल हाँस्पिटल नागपूर च्या नँशनल एड्स कंन्ट्रोल आँर्गनाझेशन (नँको) या प्रोजेक्ट वर कार्यरत “एसटीआय” या एड्स या आजार व रुग्णांवर सर्वेक्षण करण्याकरिता सहायक प्राध्यापीका डॉ सोफी सायना वय 27 रा नागपूर यांच्या नेतृत्वात डॉ सुकन्या कंबळे नागपूर, डॉ शुभ्रा जोशी नागपूर यांचे सोबत प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे हिवताप विभागाचे अधिकारी ठाकरे व परिचारिका प्रतिभा लांजेवार अशी टीम दोन चमु बनवून शहरातील वार्ड क्र.17 पलीया शाळे नजीक पहलेपार सावनेर येथे मागे पुढे राहत सर्वेक्षण करत असतांना आरोपी निलेश अशोक कन्हेरे वय 22 रा.बाजार चौक कसाई पुरा सावनेर याने त्याच्या जवळ बाटलीत असलेला एँसीड सारखा द्रव पहिल्या टीमवर फेकण्याचा प्रयत्न केला परंतू त्यास यश मिळाले नाही तर त्याने लगेच पुढे आसलेल्या सोफी सायना यांच्या टिमवर त्या माथेफीरुने त्याच्याकडे असलेले द्रव्य या टिमवर फेकल्याने डॉ सोफी सायना यांनी त्या एसीड हल्यातून बचन्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या डाव्या पायाच्या मांडीवर ते एँसीड पडल्याने त्याचे कपडे जळून त्यांची मांडी भाजल्याचे वु्त्त असुन त्यांच्या जवळ उभ्या असलेल्या कु.गौरी हरिदास सोनेकर वय 14 रा.सावनेर व सुरेखा दिलीप बंन्डे वय 40 रा.सावनेर या दोघींवर सदर एसीड रुपी द्रव्य पडल्याने त्यांनाही जळजळ होऊ लागली.कु.गौरी हिच्या मानेवर तर सुरेखाच्या हनवटी व वरच्या ओठावर एँसीड चे शिंतोडे उडाल्याने अधिक जळजळ होऊ लागली घटनेची माहिती कळताच स्थानिकांनी आरोपीला आपल्या ताब्यात घेऊण पिडित जखमींना तात्काळ प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे पोहचविण्यात आले व त्याच्यावर डॉ मंगेश बनसोड,डॉ संदीप गुजर,डॉ पंकज कानोडके,डॉ स्वप्नील मोहरकर व सहाय्यक घनश्याम तुर्के यांनी लगेच प्रथमोपचार करुण सदर घटनेची सुचना मेडिकलनागपूर च्या वरिष्ठांना देऊण एँसीड हल्यात बाधित तिघींना पुढील उपचाराकरिता नागपूर येथे हलविण्यात आले*

 

*घटनेची माहिती मीळताच सावनेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांनी घटनेचे गांभीर्य जानून आपल्या ताफ्यासह प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे धाव घेऊण संतप्त जमावास शांत करूण जखमींना तात्काळ नागपूर रवाना केले व सदर घटनेची माहिती वरिष्ठ अधिकार्यांना दिली असता उपविभागीय पोलीस अधिकारी सांभरकर,सावनेर चे तहसीलदार दिपक कारंडे आदींनी प्राथमिक आरोग्य केन्द्रात पोहचून पिडीतांची विचारपूस केली*

*अचानक घडलेल्या या एँसीड हल्याच्या प्रकारामुळे प्राथमिक आरोग्यकेन्द्रावर बघ्यांची उसळून रोष व्यक्त होऊ लागला तर सदर एँसीड् फेक हल्यात एँसीडचे हल्के शिंतोडे परिसरात राहणाऱ्या गौरी सोनेकर व सुरेखा बंन्डे यांच्या चेहर्यावर तर सोफी सायना हिंच्या पायावर पडल्याने तिघांचा चेहरा थोडक्यात बचावला हे विशेष*

*आरोपींने सदर कु्त्य कोणत्या मानसिकतेतून केले हे कळले नसून पुढील तपासात ते नक्कीच निश्पन्नास येईलच*

*हिंगणघाट जळीत प्रकरणाची शाई आळण्या आधिच हा एँसिड हल्ला अश्यात समाजात महिला कितपत सुरक्षित आहे असा प्रश्न ऐरणी लागला असुन शासन महिला सुरक्षीतते करीता कठोर कायदा तयार करण्या करिता अजून कीती दुदैवी प्रकरणाची वाट बघणार आहे अश्या तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून होत आहे*

*तर सदर घटनेची माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य जानून अतिरिक्त पोलीस अधिक्षक मोनीका राऊत आपल्या सोबत स्थानिक गुन्हे शाखा नागपूर चे सहाय्यक फौजदार बाबा केचे व सहकार्यांना सोबत घेऊण घटनास्थळी डेरा दाखल झाल्या असुन घटनेची सखोल माहीती घेत आहे*

*सदर एँसीड् हल्यात प्रभावित तिघी महलांची प्रकु्ती स्थीर असुन सावनेर पोलिसांनी आरोपीला आपल्या ताब्यात.घेतले असुन अतिरिक्त पोलीस अधिक्षक मोनीका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक अशोक कोळी पुढील तपास करत आहेत*

*घटनेतील पुढील अपडेट सामोरच्या बातमीत…*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …