*सावनेर एँसीड हल्ला*
*विक्षिप्त मानसिकता खपवून घेतल्या जाणार नाही*
-सुनील केदार*
(दुग्ध विकास ,पशु संवर्धन व क्रीडा व युवा कल्याण मंत्री महा.शासन)
*प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर ला भेट देऊण पिडितांशी साधला संवाद*
*कठोर उपाय योजना आखण्याचे दिले आश्वासन*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत सावनेर प्रतिनिधि सुुुरज सेलकर*
*सावनेर शहरातील वार्ड क्र.17 पहिलेपार हद्दीत एड्स आजारावर व रुग्णांचे सर्वेक्षण करण्याकरिता आलेल्या पथकावर झालेल्या आकस्मिक एँसीड हल्याने सावनेर शहरासह संपूर्णमहाराष्ट्र हादरून निघाले असून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीत प्रकरणाची शाई वाळण्यापुर्वीच घडलेल्या या दुर्दैवी प्रकारामुळे परत एकदा समाजमन स्तब्ध झाले असुन सदर घटनेवर सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असुन परत एकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणी लागल्याचे चित्र उघडकीस येत आहे*
*नँशनल एँड्स कंन्ट्रोल आँर्गनायझेशन वर कार करणारे नागपूर मेडिकल येथील “एसटीआय”पथकावर आरोपी निलेश अशोक कन्हेरे यांच्या व्दारे फेकण्यात आलेले एँसीड रुपी द्रव्य तीतके ज्वलनशील नसल्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापासुन जरी बचावली तरी सदर घटनेत पिडित डॉ सोफी सायना सोबतच शहरातील कु.गौरी हरिदास सोनेकर वय 14 व सुरेखा दिलीप बंन्डे वय 40 दोघेही रा.पहलेपार सावनेर यांना किरकोळ इजा पोहचल्या सदर घटनेत जरी गंभीर स्वरूपात नसल्या तरी घटनेची माहिती कळताच संपूर्ण प्रशासन,प्रसार माध्यम व जन सामान्यातून सदर घटनेचा निषेध नोंदविल्या जात असुन कठोर कारवाई ची मागणी होत आहे*
*सातत्याने घटत असलेल्या सदर प्रकारच्या जिवघेण्या घटनांनी परत एकदा समाजात कार्यरत महिलांन सोबतच इतर महिला कितपत सुरक्षित आहे असा प्रश्न निर्माण होऊण विशेषतःमहिलांन मधे भीतीचे वातावरण निर्माण होणे अपेक्षितच आहे*
*विक्षिप्त मानसिकता खपवून घेतल्या जाणार नाहीं*
*वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट व नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे घटलेल्या दोन्हीही घटना मानवतेला हादरा देऊण विक्षिप्त मानसिकतेचा परिचय देणार्या घटना असुन महाराष्ट्र शासनाचे दुग्ध विकास,पशु संवर्धन व क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या कार्यक्षेत्र म्हणजे सावनेर विधानसभा क्षेत्र व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांना सदर दुर्दैवी घटनेची जान असल्यामुळे मा मंत्री महोदय सुनील केदार यांनी प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर ला भेट देऊण पिडित डाँक्टर व दोन्ही पिडितांशी भेट देऊण त्यांच्याशी संवाद साधून त्याच्या आरोग्या विषयी माहिती घेऊण त्यांच्या कूशलतेवर संतोष व्यक्त करत सदरहू दुर्दैवी घटना या मानसिक विक्षिपतेतून जरी घडत असल्या तरी याकरिता कठोर कायद्याची नितांत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करीत शासकीय उपक्रम राबवितांना शासकीय कर्यचार्यांच्या व विशेषतः महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेवर लक्ष देणे ही तीतकेच गरजेचे असल्याचे बोलत सावनेर चे तहसीलदार दिपक कारंडे व ठाणेदार अशोक कोळी यांना तश्या प्रकारच्या सुचना देत अश्या घटनांनवर आळा घालण्याकरिता लवकरच कठोर उपाययोजना आखण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी नागपूर जिल्हा परिषद उप सभापती मनोहर कुंभारे,शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष पवन जैस्वाल,नगर सेवक निलेश पटे प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे प्रपाठक डॉ मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते*
*तपासातुन घटनेची सत्यता निष्पन्नास येईल*
*अशोक कोळी*
पोलीस निरिक्षक पो.स्टे.सावनेर
*सदर घटनेचे तपास अधिकारी सावनेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांनी आमचे स्थानिक प्रतिनिधींनि माहिती देत म्हटले की सदर एँसीड रुपी द्रव्य तीतके ज्वलनशील नसल्याने मोठी दुर्दैवी घटना होण्यापासून बचावली असली तरी सदर एँसीड रुपी ज्वलनशील द्रव्य आरोपीने कोठून आणले,या एँसीड हल्याच्या मागचा हेतू काय ,आरोपीच्या सोबत कुणी तर नाही ना ईतर भरपूर श्या बाबींवर आमचा तपास सुरु असुन तपासा अंती ते नक्कीच निष्पन्नास येईलच असे मत व्यक्त केले*
*आरोपी सध्या अटकेत असुन चौकशी योग्य दिशेने सुरु असल्याची ग्वाही दीली याप्रसंगी दीली तर सदर घटनेतील पिडित डॉ सोफी सायना हिने आपल्या वर ओढावून आलेल्या घटनेची सविस्तर माहिती देत मा.मंत्री महोदय सुनील केदार यांना सांगितले की आरोपींने आमच्या सोबत बाचाबाची करत म्हटले की तुझ्या चेहरयावर एँसीड फेकून जाळले तर तु काय करशील असे म्हणत त्याने चक्क त्याच्या जवळ असलेल्या बाटलीतले द्रव्य आमच्या दिशेने भीरकावल प्रसंग बघून आम्ही स्वताचा बचाव केला नसता तर ते एँसीड रुपी द्रव्य आमच्या चेहर्यावर आले असे अश्या विक्षिप्त मानसिकतेच्या आरोपीवर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे जेणेकरून भविष्यात अश्या घटनांवर आळा बसुन महिला सुरक्षित भावाने आपल्या कर्तव्याशी स्वातंत्र्य पणे न्याय करु शकेल असे मत व्यक्त केले*
*याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे डॉ संदीप गुजर,भुषन सेंबेकर,डॉ मंगेश बनसोड,डॉ प्रविण वाकोडे,सहाय्यक घनश्याम तुर्के,माजी नगरसेवक लक्ष्मीकांत दिवटे,युवा समाजसेवी मनोज बसवार,अश्वीन कारोकार,चंदु कामदार,अजय डाखोळे,सचिन मोहतकार इत्यादी प्रामुख्याने उपस्थीत होते*