*सावनेर एँसीड हल्याचे उलगडू लागले रहस्य* *सावनेर पोलिसांचा तपास योग्य दिशेने* *सावनेर पोलीस आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी*

*सावनेर एँसीड हल्याचे उलगडू लागले रहस्य*

*सावनेर पोलिसांचा तपास योग्य दिशेने*

*सावनेर पोलीस आरोपीला तीन दिनवसाची पोलीस कोठडी*

मुख्य संपादक किशोर ढूंढेले सोबत सावनेर प्रतिनिधि सूरज सेलकर 

*सावनेरः दि.13 फेब्रुवारीला सकाळी 12 च्या दरम्यान मेडिकल नागपूर च्या नँशनल एड्स कंट्रोल आँर्गनायझेशन च्या पथकावर माथेफीरू निलेश अशोक कन्हेरे व्दारे केलेल्या एँसीड हल्याचे रहस्य आता हळू हळू उलगुडू लागले असुन पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांच्या नेतृत्वात तपास यंत्रणेत गती येत असुन घडलेल्या दुर्दैवी प्रकाराचा उलगडा लवकरच लागण्याची शक्यता बळावली आहे*

*समाजमनारा हेलावून टाकणार्या या दुर्दैवी एँसीड हल्याच्या मागील पार्श्वभूमीतून पुढे येत असलेल्या माहिती नुसार आरोपी नीलेश कन्हेरे याचा दि.12 फेब्रुवारीला रा रात्री 10 च्या दरम्यान मोटरसायकल मागण्याच्या विषयावर वाद झाला असल्याची घटना घडली होती*

*मिळालेल्या माहितीनुसार जमील कुरैशी रा.कसाईपुरा बाजार चौक सावनेर या चिकन व्यवसायानी दि.12 फेब्रुवारीला रात्री 10-00च्या दरम्यान पोलीस स्टेशन सावनेर येथे आरोपी निलेश अशोक कन्हेरे यांनी मला माझी नवीन मोटरसायकल मागितली तो दारू पेऊण असल्यामुळे मी त्यास नाकार दिल्याने मला शिवीगाळ करुण जिवे मारण्याचे तसेच माझी गाडी पेटवून देण्याची धमकी दिली असल्याची तक्रार केली असता सावनेर पो.स्टे.ला भादवी 504,506 कलमे नुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती*

दि.12फेब्रुवारीला रात्री घडलेल्या घटनेशी एँसीड् हल्याची जुडती कडी़

*दि.13 फेब्रुवारीला सकाळी 12 चे दरम्यान घडलेल्याएँसीड हल्यामुळे एकीकडे शहरात तणावाचे वातावरण तर दुसरी कडे एँसीड हल्याचा तपास अश्यात तपास चक्रे फीरत असतांनाच दि.12 फेब्रुवारीला घडलेल्या झालेला वाद व सदर दुर्दैवी एँसीड हल्याचे सुत जुडू लागले.व तपास कार्यात गती येऊ लागली आरोपीने पिडित डाँक्टर सर इतर दोघांवर भीरकवलेले एँसीड रुपी द्रव्य हे बाजारातील मीनाक्षी सीनेमा गु्ह येथून पिण्याच्या पाण्याचाप्लास्टिक बाटलीत चोरून घेत घटनेच्या पहिल्या रात्री झालेल्या जमील कुरैशीच्या शोधात निघाल्याचे माहिती उघडकीस येत असुन आरोपीने त्याला अथवा त्याच्या गाडीला जाळण्याचा निश्चय केल्याचे सुत्र असुन अश्यातच वार्ड क्र.17 पहलेपार येथे नँशनल एँड्स कंन्ट्रोल आँर्गनायझेशन (नँको) चे पथक आपले सर्वेक्षण कार्य करत असतांनाच पिडित डॉ.सोफी सायना हिच्याशी आरोपीने उगाच वाद घालत फिल्मी स्टाईल ने “तु सुंदर है,अगर मैने तेरे चेहरे को एँसीड डालकर बिघाड़ दीया तो तु क्या करेगी”असे म्हणत त्यानी त्याचा जवळ असलेले एँसीड रुपी द्रव्याची बाटली तीच्यावर भीरकावली अचानक झालेल्या हल्यातून स्वतःला सावरत आरडाओरड केली असता सोबतचे साथीदार व स्थानिकांनी आरोपीला पकडून चांगला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले*


*आरोपी निलेश अशोक कन्हेरे याच्या विरोधात अपराध क्र.78/20 भादवी कलम 307,334 (ब) नुसार गुन्ह्याची नोंद करुण पुढील तपास अतिरिक्त पोलिस अधिक्षक मोनीका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक अशोक कोळी व सहकारीअधिकारी करत असुन लवकरच घटनेची संपूर्ण सत्यता तपासातुन पुढे येण्याची शक्यता आहे*

*आरोपी निलेश यास दि.14 फेब्रुवारीला न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय सावनेर येथे हजर करुण घटनेतील सबळ पुरावे हस्तगत करण्याकरिता दि.14 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी अशी तीन दिवसीय पोलीस कोठडी मीळवून पुढील तपास सावनेर पोलीस करत आहे*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …