*महिला सक्षमीकरण व जनजागरण मेळावा संपन्न*
अहेरी प्रतिनिधी श्रीकांत दुर्गे
पेरमिलीः पोलीस अधिक्षक गडचिरोली मा. शैलेश बलकवडे सा. यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 12/02/2020 रोजी उपपोस्टे पेरमिली हद्दीतील मौजा कोरेली येथे उपपोस्टे पेरमिली यांचे वतीने भव्य महिला सक्षमीकरण व जनजागरण मेळावा घेण्यात आला. मेळाव्यास मौजा कोरेली,कचलेर,हिनभटटी येथील अंदाजे 150 ते 200 महिला उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांचे स्मृतिस अभिवादन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तर अध्यक्षस्थानी म्हणून शील साहेब मंडळ अधिकारी महसूल विभाग पेरमिली हे उपस्थित होते
मेळावा दरम्यान हद्दीतिल उत्कृष्ट काम करणाऱ्या १५ बचत गटांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन सत्कार करून त्यांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. महिलांना विविध शासकीय योजना तसेच आरोग्य बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
मेळाव्यातील महिलांना साडी वाटप, संगीत खुर्ची स्पर्धा, रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले व विजेत्याना बक्षीस देण्यात आले. तसेच लहान मुलांची डान्स स्पर्धा घेण्यात आली.उपस्थितांना जेवनाची मेजवानी दिली. सर्व मेळावा उपपोस्टेच्या सर्व महिलांनी नियोजन करून पार पाडला.