*रामटेक-मनसर रोडवर स्कूटीस्वार महिला जागीच ठार*
रामटेक तालुका प्रतिनिधी-ललित कानोजे
रामटेक मनसर महामार्गावर सध्या रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. रस्ता ठिकठिकाणी खोदण्यात आला आहे.या रस्त्यावर दुचाकीस्वार पती-पत्नी होंडा एक्टिवा स्कुटी क्रमांक-एम एच 31,ईएस4436 ने मनसर कडे जात असताना स्कुटी रस्त्यावरून घसरून पडली. पती-पत्नी दोघेही रस्त्यावर पडले.दुर्दैवाने मागून येणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक एम एच 40-बीजी-6220 ने महिलेच्या डोक्याचा चेंदामेंदा केला व तिचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक 14 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 5 वाजताच्या सुमारास शितल वाडी येथील किमया हॉस्पिटल जवळ घडली.स्कुटीचालक पती मिलिंद बोरकर यास किरकोळ जखमा झाल्यात. बोरकर दाम्पत्य बचत गटाच्या कामानिमित्ताने रामटेक येथे आले होते व परत जाताना हा दुर्दैवी अपघात घडला.महिलेला ट्रकने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाल्याने घटनेच्या नंतर मोठ्या प्रमाणावर परिसरातील नागरिक गोळा झाले.रस्त्याचे काम सुमारे 2 महीन्यांपासून बंद आहे. रस्ता संपूर्णपणे खोदलेला आहे.त्यामुळे रामटेक मनसर हा रस्ता अतिशय वाईट अवस्थेत असून आगामी काळात अजूनही अपघातांना निमंत्रण देणार असल्याचे दिसून येत आहे. स्कुटी स्वर महिलेच्या मृत्यूनंतर सदर ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर जमा व केल्याने सुमारे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली होती अर्ध्या तासानंतर रामटेक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली व वाहतूक पूर्ववत सुरू केली रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट असून लोकांना तो येण्याजाण्याच्या लायकीचा करून द्यावा अशी मागणी या अपघाताच्या निमित्ताने सर्वसामान्य करीत आहेत.