*मुलगी अपघातात मरण पावल्याचे धक्क्याने वडिलांचा मृत्यू*

*मुलगी अपघातात मरण पावल्याचे धक्क्याने वडिलांचा मृत्यू*

रामटेक तालुका प्रतिनिधी- ललित कनौजे

रामटेक मनसर महामार्गावर दिनांक 14 फेब्रुवारी 2019 रोजी घडलेल्या दुर्दैवी अपघातात अंतकला मिलिंद बोरकर या महिलेचा मृत्यू झाला. अंतकला बोरकर यांचे वडील आजारी होते. काही दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा धक्का आला होता. त्यामुळे ते आजारी होते दरम्यान काल मुलीचा मृत्यू झाल्याचे कळताच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ते मनसर येथील रहिवासी होते.मुलगी व वडिलांच्या मृत्यूने मनसर व परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेत मृत्यू पावलेल्या अंतकला बोरकर यांचे पती मिलिंद बोरकर यांनी आपल्या पत्नीच्या रस्ता बांधकाम करणारी कंपनी असून त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा आशयाची तक्रार रामटेक पोलिस ठाण्यात केली आहे रामटेक मनसर या रस्त्याबाबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नागपूर जिल्हा महासचिव उदयसिंह यादव यांनी यापूर्वीच वर्षभरापासून वारंवार तक्रारी करून या रस्त्याच्या बांधकामासंदर्भात विविध अडचणींबाबत लक्ष वेधले होते याबाबत त्यांनी

*मनसर-रामटेक-तुमसर-तिरोडा-753 राष्ट्रीय राजमार्ग विभाग ह्या रसत्याचे बांधकाम जुन्या रसत्याचे उंचीतच करावे जेणेकरून लोकांची घरे,दुकाने खाली जाऊ नयेत याबाबत मागील फेब्रूवारी 2019 पासून निवेदन देण्यात आली, आंदोलन करण्यात आले, परंतु बांधकाम विभाग झोपेत असल्याचा आरोप केला आहे*
*त्यांनी बारब्रिक कम्पनी ने मनसर ते रामटेक रस्ता खोदुन टाकला व तसेच सोडून दिल्यामुळे रोज ये-जा करणारे लोक पडतात, कंपनी कडून असा व्यवहार जाणून-बुझुन केला जात आहे.*
*यामुळे एखाद्या वेळेस कुणाचा रसत्यावर पडून मागून येणाऱ्या गाड्यामुळे अपघात होऊन जीव जाण्याची शक्यता नकारता येत नाही.*
*रसत्यावर माती टाकल्यामुळे प्रचण्ड धूळ उड़त आहे, धूळ थांबविन्यासाठी पाणी टाकले की मातीत चिखल होऊन लोक घसरून खाली पडतात.*
*कम्पनी व बांधकाम विभाग हेतुपुरस्पर, जाणून असी घटना घडावी याची वाट पाहत असल्याचे म्हटले आहे.*
*जी कुपोषित नेते मंडळी पूर्वी आमच्या सोबत होती,थोड्यस्या चिरमिरी भेटली की कुणाच्या ही मागे फिरू लागतात अस्या टुकार,छुटक्या नेत्यांना हाताशी धरून दोन नेत्यांनी काम बंद केल्याचे बोलून-बोलून लोकांना भड़कविन्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप यादव यांनी सोशल मीडियावर केला आहे.*
*कम्पनी ने फक्त जसा श्री खडतकर यांच्या हॉल समोरिल रसत्याची उंची जसी जुन्या रसत्याचे उंचीत केली तसे माझ्या वाहिटोला येथील माझ्या गावात करायला तयार आहे, परंतु मनसर-खैरी(बिजेवाडा)-शितलवाडी(परसोड़ा)-रामटेक बायपास पर्यन्त सर्वांच्या घरे-दुकान खाली जाऊ नयेत यासाठी भांडुन, मागणीप्रमाणे काम व्हावे.*
*याकरिता प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.*
*मी कधी विकणार नाही,कधी झुकणार नाही,हा माझा स्वभाव आहे,आणि नेहमी राहणार असल्याचे नमूद केले आहे.*
*रामटेक ते मनसर पर्यंत छोटी दुचाकी वाहन चालवीणाऱ्यानी आपली वाहन सांभालूंन चालवावी,थोड़ी काळजी घ्यावी अशी विनंतीवजा सुचनाही त्यांनी सोशल मीडियावर केली होती*
*आज थोड़ा त्रास होईल या करिता मला माफ करावे, परंतु भविष्यातली माझ्या गावाची परिस्थितकी(Ecology) बिघडणार नाही*
यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मत व्यक्त केले आहे. दरम्यान त्यांनी मृतक अंतकला बोरकर यांच्या मृत्यूस रस्ता बांधकाम करणाऱ्या बारब्रिक कंपनीस दोषी धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …