पाटणसावंगी येथे बँक कर्मचाऱ्या कडून ग्राहकांना अरेरावी – *आंदोलन करण्याचा इशारा*

बँक कर्मचाऱ्या कडून ग्राहकांना अरेरावी


*आंदोलन करण्याचा इशारा*

पाटणसावंगी प्रतिनिधि – अक्षय चिकटे

पाटणसावंगीबँकेत येणाऱ्या ग्राहकांना खुप अडचणी आहेत, स्थानिक भागातील स्टेट बँकेतील कर्मचाऱ्याच्या गैर वागणुक व सतत लिंक फेल असल्याने आर्थिक व्यवहार प्रभावित होत असल्याने तसेच कुठलीही सुधारणा केली जात नसल्याने बँकेतील खातेदाराना त्रास सहन करावा लागत असल्याचा प्रकार येथील भारतीय स्टेट बँकेत होत आहेत.


पाटणसावंगी हे सावनेर तालुक्यातील मोठया गावांपैकी एक असून, येथे भारतीय स्टेट बँक ही राष्टीयकृत एकमेव बँक आहे. या बँकेला परिसरातील १६ गावे जोडण्यात आली असून या शाखेच्या खातेदारची संख्या ३० हजाराहून अधिक आहे. त्यात शासनाचे विविध लाभ जमा होणारे,सेवा निवृत्ती धारक,विद्याथी ,शासकीय व निम शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन खाते ,शेतकरी ,व्यापारी ,मजूर ,निराधार योजना व इतर आदींचे समावेश आहे.
यातील बँकेत ८०० खातेधारक रोज रक्कम जमा करणे, रकमेची उचल करणे यासह बँकिंग कामाकरिता येतात.मागील काही वर्षापासून देशातील सर्व बँकांचे व त्यांचा विविध शाखेचे व्यवहार कोअर बँकिंग पद्धतीमध्ये ऑनलाईन करण्यात आले.त्यामुळे बँकेतील कॉम्पुटर इंटरनेटने एकमेकांना जोडले आहे. मागील काही दिवसापासून सतत लिंक फेल व कर्मचाऱ्याचा गैर वागणुक मुळे त्याचा त्रास नागरिकांना होत असतो.

# या शाखेत पाच काउंटर आहेत त्यापैकी एक काउंटर सुरू राहतात त्यामुळे मोठया प्रमाणात गर्दी राहते याचा त्रास खातेदारांना होतो.

#बँकेचे नवीन पासबुक व जॉइंट अर्ज या शाखेत उपलब्ध नसल्याने खातेदारांना याचा त्रास होत आहे.कर्मचाऱ्यांना विचारले तर त्यांची गैर वागणूक असतात ते टाळाटाळी व मला माहीत नाही व अरेरावीने बोलतात, ऑनलाईन च्या जमान्यात जर खाते उघडण्यासाठी एक महिना लागत असेल तर ग्राहकांची कामे कशी होतील ,

शाखेत दोन कर्मचाऱ्याची गरज आहेत त्यामुळे या प्रकारचा त्रास खातेदारकाना होत आहे याची माहिती नागपूर मुख्य शाखा याना कळविले आहेत अशी माहिती पाटणसावंगी शाखा व्यवस्थापक प्रमोद राऊत यांनी दिली.
परंतु या अगोदर पण असे आश्वासन व्यवस्थापक यांनी दिले होते.
ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून बँक प्रशासनाने काही उपयोजना करणे गरजेचे आहे, जेणेकरून ग्राहकांना त्रास होणार नाही, असे मत ग्राहकांनी व्यक्त केले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …