*पौराणिक महत्वप्राप्त कोलार नदीला गत वैभव मिळवून देण्याकरीता सामाजिक संस्थांचा पुढाकार*
*नगरातील इतर सामाजिक संघटनांना सोबतच स्थानिक प्रशासन,राज्य व केन्द्रिय शासनाच्या मदतीने उद्दिष्ट पुर्ततेची संकल्पना*
*मिळत्या जनाधारानी कोलार नदीचे पुनरूज्जीवन अभियान पुर्ण होण्याची आशा बळावली*
मुख्य संपादक किशोर ढूंढेले सोबत सावनेर प्रतिनिधि सूरज सेलकर
*सावनेर *आपल्याही गावात नदी होती परंतु आपले पूर्वज अदुरदर्शी व आकरमन्य होते आपल्या या पुरातन सारस्वत पूर नगरीला लाभलेला पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या कोलार नदीच्या वारसा त्यांना नीट जपता आला नाही असा आरोप येणारी पिढी आपल्यावर करता कामा नये*
*एक जिवंत समृद्ध पर्यावरण असलेली नदी आपल्या शहरातील पुढच्या पिढीला देण्याचा उद्देशाने कोलार पुनरुज्जीवन अभियान ही संकल्पना “समर्पण फाउंडेशन सावनेर”द्वारे नदी वाचवा या पत्रकाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांसमोर मांडण्यात आली व कोलार नदीला पुनर्जीवित करणे अशक्य नाही ही धारणा लोकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादांना अधिक बळकट झाली*
*कोलार नदी संरक्षण व संवर्धन हा एक विराट संकल्प आहे एकट्या प्रशासकीय किंवा पु्थक सामाजिक प्रयत्नांनी हा संकल्प पूर्ण होणं अवघड आहे कोलार पुनर्जीवन अभियान ही संकल्पना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रशासन आणि समाज यांच्या संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता आहे तात्पूर्वी स्वच्छता मोहीम राबवून कोल्हार नदी प्रदूषण मुक्त होणार नाही त्यासाठी विविध माध्यमातून नदी पात्रात येणार्या शहरातील घन व द्रव कचरा इत्यादी प्रदूषणकारी घटकावर कायम स्वरुपी उपाययोजना करून नदीची नैसर्गिक पर्यावरण पुनर्रचित करण्यासाठी आवश्यक सर्व बाबी नियोजन पूर्वक करावे लागतील यासाठी समर्पण फाउंडेशन सावनेर द्वारे मा. मुख्याधिकारी नगर परिषद सावनेर यांना कोलार नदी संरक्षण व संवर्धनासाठी “एम.आर.एस.ए.सी” च्या माध्यमातून विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करून “एस.आर.सी.बी.” योजने अंतर्गत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याबाबत निवेदन दिले आहे त्याच बरोबर मा.नगराध्यक्ष न.प.सावनेर,मा. उपनगराध्यक्ष विरोधी पक्ष गटनेते यांना देखील निवेदनात केलेल्या मागणी संबंधित ठराव नगर परिषद सभागृहात घेण्यासंबंधी निवेदन समर्पण फाउंडेशन तर्फे देण्यात आलेले आहेत*
*पौराणिक कोलार नदिचे पुनर्जीवन अभियानाचा रूपांतर शासकीय परियोजना होऊन नदी संरक्षण व संवर्धना संबंधि ठोस कार्य व्हावे याकरिता समर्पण फाऊंडेशन सावनेर सोबतच शहरातील अनेक सामाजिक संस्था आपला सहभाग नोंदवित असुन येणार्या काही दिवसात कोलार नदीच्या पुनरूज्जुवन कार्यास सुरुवात होण्याची शक्यता नागरिकांच्या वाढत्या सहभागामुळे बळावल्या आहेत*
*नगरितील कोलार नदीला गत वैभव मिळवून देण्याच्या या अभियानास आपल्या संस्थेचे समर्थन दर्शन घेणारे पत्र आपण आम्हाला द्यावे अशी विनंती समर्पण फाऊंडेशन सावनेर चे अध्यक्ष अँड् अभिषेक मुलमुले,उपाध्यक्ष डॉ. नितीन पोटोडे व सचिव सोनु नवधिंगे यांनी पत्रकाद्वारे केली असुन*
*समर्पण फाऊंडेशन सावनेर चे विनोद बागडे,तुषार उमाटे,अभिषेकसिंह गहरवार,डॉ. राहुल दाते,डॉ. विलास मानकर,मंधार मंगळे,प्रवीण नारेकर इत्यादी सदर प्रकल्प यशस्वीते करीता परिश्रम घेत आहे*