बारावीची परीक्षा द्या आत्मविश्वासाने- वसंत पहाड़े- 12वी ची परीक्षा झाली प्रारंभ

बारावीची परीक्षा द्या आत्मविश्वासाने- वसंत पहाड़े

12वी ची परीक्षा झाली प्रारंभ

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा मंगळवार, १८ फेब्रुवारी रोजी सुरू झाली आहे. इंग्रजीच्या पेपरने या परीक्षेला सुरुवात झाली.
एक महिन्यापर्यंत ही परीक्षा चालणार असून १८ मार्च रोजी परीक्षेचा शेवट होईल. या परीक्षेकरिता २१ जानेवारी रोजी बोर्डाने प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली आहेत. बोर्डाच्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना ही प्रवेशपत्रे डाउनलोड करावयाची होती. परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या सर्व गोष्टी घेऊन जाव्यात. तसेच पुरेशा वेळेआधी परीक्षा केंद्रांवर पोहोचावे, असे आवाहन परीक्षा मंडळाने केले आहे. बारावीची परीक्षा संपल्यानंतर दहावीच्या परीक्षेला ३ मार्चपासून सुरुवात होणार आहे.
ताण नको, शांततेने द्या पेपर
बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी महत्त्वाची असते. मात्र, या परीक्षेचे अनावश्यक दडपण घेऊ नका. शांततेने आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा. व्यवस्थित झोप, योग्य आहार, अभ्यासाचे अतिरिक्त दडपण न घेणे या बाबींची काळजी घ्यावी. आपल्या वेळेचे योग्य नियोजन करणे, पेपर लिहिताना लहान-लहान चुका टाळणे आणि आत्मविश्वासाने पेपर सोडविणे महत्त्वाचे आहे. बारावीची परीक्षा महत्त्वाची असली तरी ही आयुष्यातील अखेरची परीक्षा नाही. त्यामुळे, काही कारणे लहानमोठ्या चुका झाल्यास त्याचा फार बाऊ करू नये. पालकांनीही या काळात विद्यार्थ्यांना अकारण दडपण आणणे टाळावे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

तपासून घ्या या बाबी…

आपले प्रवेशपत्र आणि त्याची फोटोकॉपी जवळ बाळगा.
– कोणताही कागदाचा तुकडा, मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जवळ बाळगू नये.
प्रवेशपत्रांवर परीक्षेसंदर्भात दिलेल्या सूचनांचे पालन करा.
– पेपर लिहिण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या बाबी बरोबर आहेत किंवा नाही, हे तपासून बघा.
परीक्षा केंद्रांवर पुरेशा वेळेआधी पोहोचा
*सावनेर शहरात भालेराव ज्यूनियर काँलेज व कला वाणिज्य महाविद्यालय असे दोन परिक्षा केन्द्र असुन सावनेर शहरातील एकुण 793 विद्यार्थी परिक्षा देत असुन प्रा.बाब टेकाडे व डी.जी.दळवी हे कला वाणिज्य महाविद्यालय चे केन्द्र प्रमुख व सहाय्यक केन्द्र प्रमुख म्हणून तर वसंत पहाडे व चिमने हे भालेराव ज्यूनियर काँलेज चे केन्द्र प्रमुख व सहाय्यक केन्द्र प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत

भालेराव ज्यूनियर काँलेज, सारस्वत पब्लिक स्कूल, राम गणेश गडकरी महाविद्यालय, माँर्नीग स्टार विद्यालय, कला वाणिज्य विद्यालय येथील विद्यार्थी परिक्षा देत आहेत.

 १२ वी च्या परिक्षेला बसलेल्या सर्व
विद्यार्थ्याना शालांत परिक्षेसाठी
महाराष्ट्र न्यूज़ मीडिया तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!
यशवंत व्हा! यशवंत व्हा!
” बेस्ट ऑफ लक ”
👍👍 👍💐💐💐

#👍ऑल द बेस्ट

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …