*पेरमिली तालुका निर्मितीची नागरिकांना प्रतीक्षा*
*तालुका झाल्यास ग्रामीण क्षेत्राचा झपाट्याने होणार विकास*
पेरमिली प्रतिनिधी -श्रीकांत दुर्गे
अहेरी तालुक्यातील परिमिली या गावाला तालुक्यातील दर्जा देण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून शासनाकडे खितपत पडली आहे.
लहान तालुके केल्यास विकासाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणे शक्य आहे. परमिली परिसरात दहा ग्रामपंचाती आहेत. या तालुक्यात जवळपास ६० गावे येतात. परिसरातील परमीली हे एकमेव गाव बस सेवेनी जोडले गेलेले आहे .
उर्वरित एकही गावाला बस ची सुविधा नसल्याने नागरिकांना पायी प्रवास करावा लागतो.एकही गावाला चांगला रस्ता नसल्याने पायदळ प्रवास केल्याशिवाय गत्यंतर नाही. पेरिमिली परिसरातील नागरिकांना परिमीली गाव ओलांडून अहेरित यावे लागते. पेरीमिली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र ,शासकीय आश्रमशाळा, आठवडी बाजाराचा सोय आहे. तालुका निर्मितीचे बहुतांश निकष पूर्ण होऊ शकतात. तरीही अहेरी तालुका निर्मितीची मागणी शासन दरबारी खितपत पडली आहे. पेरिमीली परिसरातील बहुतांश गावातील कर्मचारी उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे असल्या तरी त्यांची प्रत्यक्ष माहिती नागरिकांना मिळत नाही. त्याचबरोबर कोसो दूर असलेल्या अहेरी तहसील कार्यालयामध्ये पायपीट करीत जाऊन योजनांचे कागदपत्र सादर करणे शक्य होत नसल्याने दिसून येत आहे. परिसरातील नागरिकांच्या नाहक त्रास वाचवून शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी पेरमिली तालुक्याची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी सरपंच प्रमोद आत्राम,उप सरपंच साजन गावंडे,तुकेश कुंभारे,अविनाश कोंडागूले,कविव्यर चंदनखेडे सह समस्त गावकरी व परिसरातील नागरिकांनी केली आहे.