*खापरखेडा औष्णिक विज केंद्रातील गलथान कारभार चव्हाट्यावर*
*मानव संसाधन विभाग रेकार्ड रूममधील दस्ताऐवज जाळली*
*उच्च स्तरीय चौकाशीची मागणी*
*खापरखेडा-प्रतिनिधी*
स्थानिक औष्णिक विज केंद्र प्रशासन मागील अनेक दिवसांपासून गलथान कारभारामुळे चर्चेत आहे त्यामुळे कर्मचारी वर्गात मोठया प्रमाणात नाराजीचा सूर आहे नुकताच खापरखेडा औष्णिक विज केंद्राचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला असून सौदामिनी कार्यालय मानव संसाधन विभागा अंतर्गत असलेल्या रेकार्ड रूममध्ये ठेवलेली सार्वजनिक दस्ताऐवज जाळण्यात आली सदर रेकार्ड रूम मध्ये ठेवण्यात आलेली दस्ताऐवज व्यक्तिगत नाही ती दस्ताऐवज सार्वजनिक असतांना का जाळण्यात आली हा प्रश्न कायम असून उच्च स्तरीय चौकाशीची मागणी करण्यात येत आहे खापरखेडा औष्णिक विज केंद्राचे मुख्य कार्यालय सौदामिनी येथे आहे याच कार्यालयात मानव संसाधन विभागाचे कार्यालय असून येथील रेकार्ड रूम मध्ये विज केंद्र व कर्मचाऱ्या वर्गाशी संबंधित असलेले दस्ताऐवज सुरक्षित ठेवण्यात येते मात्र सदर रेकार्ड रूम मध्ये जुने दस्ताऐवज असल्याचा हवाला देत 26 फेब्रुवारी बुधवारला सकाळच्या सुमारास सौदामिनी कार्यालयाच्या मागच्या बाजूला जाळण्यात आली
वास्तविक पाहता सार्वजनिक दस्तलेख कायद्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या विभागामार्फत रेकार्ड गहाळ, नष्ट करण्यापूर्वी पूर्व परवानगी घेणे अपेक्षित आहे सदर रेकार्ड रूम मध्ये ठेवलेले दस्ताऐवज व्यक्तिगत नसून सार्वजनिक स्वरूपाचे आहेत त्यामुळे नष्ट करण्यात येणाऱ्या दस्ताऐवज संबंधातील क्रमानुसार यादी तयार करून मुख्य कार्यालयाला सूचना देणे बंधनकारक आहे शिवाय सदर दस्ताऐवजचे महत्व लक्षात घेता त्या दस्ताऐवज उपयोग भविष्यात होणाऱ्या कार्याकरिता होणार अथवा नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे या सर्व बाबीचा विचार करूनच रेकार्ड रूम मध्ये ठेवलेले दस्तऐवज नष्ट करण्याची कार्यवाही अपेक्षित आहे नियमानुसार दस्ताऐवज नष्ट करायचे असल्यास या संदर्भातील माहिती सार्वजनिक करने आवश्यक आहे मात्र सबब माहिती सार्वजनिक केली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे खापरखेडा औष्णिक विज केंद्रात मुख्य अभियंता प्रकाश खंडारे कार्यरत आहेत विज केंद्र प्रमुख म्हणून त्यांची सर्वस्वी जबाबदारी आहे रेकार्ड रूम मध्ये वर्तमान व सेवा निवृत्त विज कर्मचाऱ्यांचे महत्वपूर्ण दस्ताऐवज आहेत सदर विज केंद्र व कर्मचारीवर्ग संबंधातील प्रकरणे न्यायालयात सुरू असल्याची माहिती मिळाली आहे मात्र सदर प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे विज केंद्रात कार्यरत अधिकाऱ्यांना दिसू लागल्याने त्यांनी महत्वाचे पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीकोनातून दस्ताऐवज जाळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे रेकार्ड नष्ट करतांना दस्ताऐवजचे बारीक बारीक तुकडे करण्यात येतात मात्र ते जाळून प्रदूषण तयार करण्या मागचा उद्देश कोणता हे समजण्या पलीकडे आहे पुरावे नष्ट करने हा गंभीर स्वरूपाचा अपराध असून भारतीय दंड संहिता कलम 201 अंतर्गत पात्र आहे यासंदर्भात मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांच्याशी मोबाईलवर संपर्क केला मात्र त्यांनी कोणत्याही प्रतिसाद दिला नाही.
*उच्च स्तरीय चौकाशीची मागणी*
खापरखेडा औष्णिक विज केंद्र सौदामिनी कार्यालयाच्या मागच्या बाजूला मानव संसाधन विभागातील रेकार्ड रूम मधील दस्ताऐवज जाळून नष्ट करण्यात येत असल्याची माहिती वाऱ्या सारखी पसरली सौदामिनी कार्यालयाच्या पहिल्या माळ्यावरून दस्ताऐवज खाली फेकण्यात येत होती तीन चार कर्मचारी जाळण्यात व्यस्त होते मोठया प्रमाणात धूर येत होता दस्ताऐवज नष्ट करतांना बारीक बारीक तुकडे करून नष्ट करण्यात येतात मात्र जाळण्यात आली सदर दस्ताऐवज ची यादी व चित्रीकरण तयार करण्यात आले का दस्ताऐवज नष्ट करतांना त्या संदर्भातील माहिती नष्ट करण्या आधी सार्वजनिक करण्यात आली का? असे अनेक डझनभर प्रश्न समोर आहेत त्यामुळे निष्पक्ष उच्च स्तरीय चौकाशीची मागणी करण्यात येत आहे.