अरोली पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गौतस्करी
अपघात कारणीभूत ठरला गौतस्करी चा
मौदा प्रतिनिधी- तुषार कुंजेकर
खात – निमखेडा येथे दिनांक २६ ला सकाळी ७ वाजताच्या दरम्यान एम एच २८ बी बी ००६५ टाटा योद्धा किंमत ५ लाख च्या मालक व चालकाने सदर वाहनात १० गोवंश जाणावरे कोंबून विना परवाना अवैध रित्या वाहून त्याची कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना सदर वाहनांच्या चालकाने वाहन अति वेगाने धोकादायक रित्या गैरजबाबदारी चालवत असताना निमखेडा येथे इलेक्ट्रिक पोल धडक दिली गाडीमध्ये एकूण १० गोवंश जनावरे किंमत अंदाचे १ लाख पैकी ५ जनावरांच्या मरण पावले व ६ जनावर जख्मी झाले सहायक निरीक्षक विविक सोनवाणे पोलीस स्टेशन अरोली यांनी घटनास्थळी पोहचून घटनास्थळा वरून एकूण ६ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्ती करून त्यांच्या विरुद्ध कलम ११(१) (ड) ,प्रा नी वा कायदा १९६० R W ५ (अ)(1)(२) सहकलम २७९,४३१,४२९, १०९, भादवी कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला
गाडीचा अपघात झाला म्हणून सापडली गाडी…………..
निमखेडा धनी येथील स्थानिक शेतकरी गोपी यांनी सांगीतल्या प्रमाणे आठवडा मधीन रोज कधी रात्री ,२, १२, १, च्या दरम्यान गोतस्करी च्या गाड्या या रोडानी भरधाव वेगाने जात असतात पण याला लगाम लावण्यासाठी अरोली पोलीस स्टेशन अपयशी ठरत आहे. गाडीचा अपघात झाला म्हणून ती पकडल्या गेली नाही तर अश्या किती तरी गोतस्करी करणाऱ्या गाड्या या रोडानी कन्हान मार्गे कामठी जात असतात
स्थानिक गुन्हे शाखा निवड कामापुरती
नागपूर स्थानिक गुन्हे शाखा निवड कामा पुरती आहे काय असा सवाल तालुक्यातील जनता करत आहे कारण तालुक्यात सट्टा, अवैध रेती तस्करी, गोतस्करी मोठ्या प्रमाणात होत असते पण स्थानिक गुन्हे शाखेच्या चमू महिन्यातून एकच कारवाई करून स्वतःला शाबासकी देत असते असा स्थानिक नागिरकांनी आरोप केला आहे