वैनगंगा एक्प्रेस महामार्ग कंपनी ची लापरवाई
रोडावर गाडी स्लिप होऊन ७ ,८ मोटरसायकल वाले झाले जख्मी
खात प्रतिनिधी – तुषार कुंजेकर
खात – मौदा वरून एक किलोमीटर वर महामार्ग क्रमांक ६ वर रोड दुरुस्ती काम सुरू आहे. हे काम वैनगंगा एक्प्रेस महामार्ग कंपनी ने विसन इन्फा कंपनीला काम दिले आहे. दिवस भर काम झाल्या नंतर काल दि. २५ तारीख ला रात्री ७ वाजताच्या सुमारास ७ ते ८ मोटरसायकल वाले पडून जख्मी झाले.
रोडवर सुरक्षा ट्यूब लावलची नाही
परमात्मा एक आश्रम ते मधूबन रेस्टॉरंट प्रयन्त एक किलोमीटर रोड ची कटिंग करण्यात आली त्यामुळे रोडच्या मधोमध ३ इंची ची उंची निर्माण झाल्यामुळे ७ ते ८ मोटरसायकल स्लिप होऊन १२ लोक जबर जख्मी झाले. जख्मी ना मौदा, व नागपूर हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले.काही काळ तणावची स्थिती निर्माण झाली लोकांनी अर्धा घंटा ट्रॅफिक जाम केले.
एवढा मोठा अपघात होऊन ही वैनगँगा कंपनी चा एक ही अधिकारी उपस्थित झाला नाही व पूर्ण एक कलोमीटर प्रयन्त कोणतीही सुरक्षा गार्ड लावला नाही
प्रतिक्रिया— चौबे मॅनेजर वैनगँगा हायवे… हे काम कत्रांट दारा ला दिले आहे.आम्हची जीमेदारी नाही, पण देखरेख तर तुमची असते म्हन्याल्यावर छुपी साधली
प्रतिक्रिया–/ रवींद्रनाथ जनरल मॅनेजर वैनगँगा महामार्ग…. हे काम विसन इन्फ्रा कंपनी कडे देण्यात आले आहे. कारवाई काय कराल तर एक मिनिटांनी फोन करतो म्हणून फोन कापले
या लापरवाई करणाऱ्या कंपनी वर कारवाई करावी ही स्थानिक नागरिकांची मागणी आहे