*राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे अनियंत्रित कामे व बेशीस्त कंत्राटदाराविरूध्द तात्काळ कारवाई करा*-
*म.न.से.चे जिल्हा संघटक सुनिल ठाकरे यांचे अधिक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांचेकडे मागणी.*
*विशेष प्रतिनिधी रामटेक*
नागपूर रामटेक राष्ट्रीय महामार्गावर मनसर ते सालई खुर्द रस्त्यावर सुरू असलेल्या अनिर्बधित , गुणवत्ता शून्य व अत्यंत दिरंगाई मधे सुरू असलेले दर्जाहीन,निकृष्ट,अनियंत्रित व अनिबांधित तसेच बेजबाबदार व बेशिस्त कंत्राटदार यावर तात्काळ कडक कारवाई करण्याबाबत आज मनसे प्रणित रस्ते,साधन – सुविधा व आस्थापना विभागाचे जिल्हा संघटक व पूर्व विदर्भ प्रभारी श्री. सुनील ठाकरे यांच्या नेतृत्वात अधिक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग मंडळ, नागपूर यांना निवेदन देण्यात आले.
चर्चेदरम्यान कांत्रदरकडून कामात सुरू असलेली दिरंगाई याबाबत पदाधिकाऱ्यांनी नाराजी प्रकट करत कंत्राटदारावर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्याबाबत मागणी जिल्हा संघटक सुनिल ठाकरे यांनी केली.
मनसर रामटेक महामार्गावर दि. २६.०२.२०२० रोजी झालेल्या अपघातात अंतकला मिलिंद बोरकर (४०)रा.वार्ड क्रं.२,नरेंद्र नगर, मनसर येथील महीले चा हकनाक जीव गेला ज्याला सर्वस्वी मुळ मालक राष्ट्रीय महामार्ग व कंत्राटदार जबाबदार असून कंत्राटदाराकडून नुकसान भरपाई पोटी ₹ १५ लाख तसेच महिलेच्या नवऱ्याला अथवा मुलाला किव्हा परिवारातील सदस्याला कंपनीत कायम स्वरुपी नोकरी देण्यास आक्रमक रित्या मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे कोणतेही सुरक्षेचे नियम न पाळल्यामुळे झालेल्या अपघाताला कंत्राटदार तसेच राष्ट्रीय महामार्ग विभाग जबाबदार असून राष्ट्रीय महामार्ग तील संबंधित अधिकारी व कंत्राटदारावर कलम ३०२ अंतर्गत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी म. न.से.प्रणित रस्ते,साधन – सुविधा व आस्थापना विभाग चे जिल्हा संघटक सुनिल ठाकरे यांनी केली.
वरील गंभीर विषयावर दिनांक ०२.०३.२०२० रोजी प्रत्यक्ष पाहणी दौरा लावण्यात आला असून त्यावेळी प्रकल्पाचे उपअभियंता,गुणवत्ता अधिकारी तसेच कंत्राटदाराचे जबाबदार अधिकारी उपस्थित रहाणार असून त्यावेळी गुणवत्ता शून्य कामे दाखवली जाणार आहेत. त्याचप्रमाणे कामातील दिरंगाई व सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून सुरू असलेले अनिर्बंध बांधकाम व त्यामुळे दिवसागणिक वाढत असलेले अपघात यावर कडक कारवाई करण्याबाबत म. न.से.प्रणित रस्ते,साधन – सुविधा व आस्थापना विभागाचे जिल्हा संघटक राष्ट्रीय महामार्ग विभागाला मागणी करण्यात येणार आहे.
रस्ते, आस्थापना विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. महेश जोशी यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हा संघटक श्री.सुनील ठाकरे यांच्या नेतृत्वात दिनांक २७.०२.२०२० रोजी अधिक्षक अभियंता यांच्या कक्षात झालेल्या बैठकीस जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री.इकबाल रिझवी, शहर अध्यक्ष श्री.अरुण तिवारी, शहर सचिव श्री.पराग सावजी, शिक्षक सेनेचे शहर उपाध्यक्ष श्री.नितीन किटे, श्री. जावेद शेख, रस्ते,व आस्थापना चे तालुका संघटक श्री. सचिन मेहरे तसेच मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.