*ईदगाह कडे जाणाऱ्या पुलाचे काम पूर्ण*
*ना.केदारांनी दिले होते आश्वासन*
*”बोले तैसे चाले” ची दिली प्रचिती*
मोहपा प्रतिनिधी
कळमेश्वर तालुक्यातील तेलकामठी या गावातील मुस्लिम बांधवांना नमाज पठण व प्रेत नेण्यासाठी ईदगाह कडे नदी ओलांडून जावे लागत होते ही अडचण मुस्लिम बांधवांनी एका निवेदनातून ना.सुनील केदार यांच्या लक्षात आणून दिले ना.केदारांनी अडचण समजून दोन तीन महिन्यात पुलाचे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले व त्यांनी दिलेला शब्द पाळून ईदगाह कडे जाणारा पूल तयार करून दिला त्यामुळे मुस्लिम समाजातर्फे त्याचे अभिनंदन केले आहे.
तेलंकामठी,तिष्टी, तेलंगाव या गावातील मुस्लिम बांधव रमजान ईद (ईद उल फित्र)व बकरी ईद (ईद उल झुहा) ची नमाज अदा करण्यासाठी तेलंकामठी येथे असलेल्या ईदगाह येथे येत असतात.ईदगाह व मुख्य रस्ता यांच्या मध्ये नदी असल्याने व ती नदी पाणी भरून वाहत असल्यान ईदगाह पर्यंत पोहोचण्यासाठी पाण्यातून जावे लागत होते त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता तसेच ईदगाह जवळच कब्रस्थान असल्याने एखादी व्यक्ती मरण पावल्यास त्याचा जनाजा कब्रस्तान कडे जाण्यासाठी तेच नदी पार करुन जावे लागत होते याच परिस्थितीची जाणीव नामदार केदार यांना तेलकामठी तेलगाव,तिष्टी येथील मुस्लिम बांधवांनी लक्षात आणून दिली आमदार केदार यांनी परिस्थिती समजून लगेच हा पुल तयार करू असे आश्वासन दिले व ते आश्वासन पूर्ण करून तेथे पूल तयार करून दिल्या मुळे आता ईदगाह व कब्रस्तान कडे जाण्यासाठी नदी ओलांडून न जाता सरळ पुल निर्माण केल्यामुळे होणारा त्रास नाहीसा झाला आहे. पुलाचे काम पूर्ण केल्याबद्दल मुशीर सय्यद, अल्ताप शेख,रफिक शेख,अय्युब पठाण,अजीज मालाधारी,रियाज मालाधारी,रहेमान बऱ्हाडे,इक्बाल शेख व इतर मुस्लिम बांधवानी ना.सुनील केदार,जी.प.उपाध्यक्ष नागपूर मनोहर कुंभारे,सरपंच प्रेमाताई डफरे,दादाराव देशमुख व सुरेश डफरे यांचे अभिनंदन केले आहे.
कबरस्तान सुशोभित करण्याची मागणी
रात्री एखादा व्यक्ती मरण पावला असता प्रेत रात्री कब्रस्तान मध्ये दफन करायचे असल्यास तिथे लाईटची व्यवस्था तसेच बैठक व्यवस्था नाही. तसेच कब्रस्तानला कुंपण नसल्याने अडचणीचा सामना करावा लागतो त्यामुळे कब्रस्तान साठी निधी उपलब्ध करून देऊन सुशोभित करण्यात यावे अशी मागणीसुद्धा केली आहे.