ग्रामपंचायत चिचोली खापरखेडा मार्फत प्लास्टिक मुक्त जिल्हा अभियान राबविण्यात आला
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी प्रतिनिधी दिलीप येवले
खापरखेडा :- पंचायत समिति सावनेर मार्फ़त प्लास्टिक मुक्त जिल्हा – पर्यवरणाशी नाते जोड़ा या संकल्पनेतुन आज दिनांक २९-०२-२०२० रोज शनिवार ला नागमंदिर खापरखेडा येथे प्लास्टिक मुक्त जिल्हा अभियान राबविन्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद्चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुयार तसेच सभापती पंचायत समिती सावनेर अरुणा शिंदे व जिल्हा परिषद् नागपुर सदस्या चिचोली सर्कल निलिमा उइके, जिल्हा परिषद् नागपुर वलनी सर्कल सदस्य प्रकाश खापरे, पंचायत समिति सदस्य चनकापुर सर्कल चंद्रशेखर पदम् , पंचायत समिती सावनेर खंडविकास अधिकारी गरुड़ पंचायत समिति सावनेर विस्तार अधिकारी साबळें ग्रामपंचायत चिचोली खापरखेडा सरपंच पुरुषोत्तम चांदेकर, ग्रामविकास अधिकारी ग्रा.पं.चिचोली (खा.) बंसोड व ग्रामपंचायत चिचोली खापरखेडा चे सदस्य संदीप सोमकुवर, धीरज देशभ्रतार, माला पानतावने, व सर्व सदस्य गण, तसेच पंचायत समिती सर्व विभागाचे कर्मचारी वृंद , जिल्हा कक्ष(स्व.भा.मि.) व ग्रा.पं. समस्त कर्मचारी यांनी या अभियानात सक्रीय सहभाग घेवून सहकार्य केले. व आजच्या अभियानात ४० किलो प्लास्टिक गोळा करण्यात आला. व दुकानदाराकडून ५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आला.
ग्रामपंचायत सरपंच चांदेकर यांनी समस्त गावातील नागरिकाणा आव्हान करतानी म्हटले की शास्त्रज्ञांनी न गंजणारी, वजनाने हलकी अशी आणि टिकाऊ वस्तू म्हणजे ‘प्लास्टिक’ हा पदार्थ बनवला खरा; पण तो टाकाऊ झाल्यावर त्याचा जिवाणूंमुळे र्हानस होत नसल्याने तो नष्ट करता येत नाही. त्यामुळे प्रदूषण होते. परत वापरात न आणता येणारे प्लास्टिकचे पदार्थ टाकायचे कुठे आणि त्यांची विल्हेवाट लावायची कशी, ही समस्या जगभर चर्चिली जात आहे. प्लास्टिक उद्योगातून लक्षावधी लोकांना रोजगार मिळाला आहे, तरीही केवळ रोजगार निर्मितीचे साधन आहे म्हणून प्लास्टिकचा वापर चालू ठेवणे धोकादायक ठरेल.
तसेच या प्लास्टिक मुक्त जिल्हा अभियान मध्ये ज्यू कॉलेज विद्यार्थी गन , आशा वर्कर, अंगनवाडी सेविका, आरोग्य विभाग कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्टित नागरिक यांनी गावातील दुकानदाराना व नागरिकाना प्लास्टिक न वापरण्या बाबत मोलाचे मार्गदर्शन केले व प्लास्टिक न वापरल्याने आपल्या आरोग्य जिवनात त्याचा किती फायदा होईल हे तत्व पटवून लोकाना आव्हान केले कि प्लास्टिक मुक्त जिल्हा व्हायला पाहिजे.