*सारस्वतपुर की कचरापुर*
*स्वच्छ भारत योजनेचा फज्जा*
*ठिक-ठिकाणी कचर्याचे ठीगारे*
*नगरवासीयांच्या आरोग्याचा मांडला खेळ*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेरः सावनेर नगरीत नगर प्रशासनाच्या लचर कार्य प्रणाली मुळे ग्राम स्वच्छता अभीयानाचा फज्जा उडून नियमितपणे कचर्याची उचल होत नसल्याचे अनेक ठिकाणी कचर्याचे ठीगारे डोलाने उभे राहून नगरीची शोभा वाढवत असुन सदर विषयावर जनप्रतिनींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे*
*नगर परिषद सावनेर व्दारा नगरातील कचरा उचल करण्याकरिता वर्षाला कोट्यवधी रुपये मोजुन सुध्दा निट कचर्याची उचल होत नसेल तर अश्या कांत्रटदाराचे लाड़ का पुरविल्या जात आहे असा प्रश्न नागरिकांतुन होत असुन कचरा उचल करणार्या सदर यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यात नगर प्रशासन सपशेल अक्षम ठरत असुन कांत्रटदार मनमानी करत असल्याने नगरीत डासांचे प्रमाण वाढत असून त्यातून ताप,हिवताप,मलेरीया,डेंगू,चिकुनगुनीया,मेंन्दूज्वर सारख्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत*
*बस स्थानक आंबेडकर पुतळा परीसर,गडकरी चौक,बाजार चौक इत्यादी ठीकाणावरील कचर्याची उचल नियमितपणे होत नसल्याने मुख्यमार्गाचे जर हे हाल असतील तर वस्तीत तर राम जाने.*
*कांत्रटदाराला मनमाफक देयक व कचरा उचल करीता वाहने पुरवून सुध्दा कचर्याची योग्य उचल होत नसेल तर याचा अर्थ “पाणी कुठे तरी मुरत आहे” याची योग्य चौकशी होणे गरजेचे आहे.*