*जागतिक महिला दिन साजरा*
*महिला समाजाचा मुख्य आधार स्तंभ*
-उर्मिला जुवारकर
विशेष प्रतिनिधी नागपूर
नागपुर सच्चिदानंद नगर योग शेड येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला पतंजलि नागपुर जिल्हा महिला प्रभारी सौ. उर्मिलाताई जुवारकर, पतंजलि महिला महामंत्री रितुताई जरगर तसेच नागपुरच्या योगप्रचारिका सौ. माधुरीताई ठाकरे माजी नगरसेविका सौ. नयनाताई झाडे, नगरसेविका सौ. कल्पना ताई कुंभलकर, नगरसेविका सौ. रूपाली ताई ठाकुर यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता विभाग प्रमुख कविता गाढवे, सौ. माधुरी निंबुळकर,मिडिया प्रभारी जोत्सना इंगळे, संध्या गुडधे, सुरेखा नवघरे, सेलोकर, मा.सुदामजी गाढवे सर, वैद्य सर, बनकर सर तसेच डांगरे सर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संचालन श्रीमती वर्षा नवघरे तर आभार प्रदर्शन सौ. कडवेताई यांनी केले. फारमोठ्या संख्येने योगसाधक येथे उपस्थित होते.
याप्रसंगी आपले विचार व्यक्त करित नागपूर जिल्हा महिला पतंजलि च्या प्रभारी उर्मिला ताई जुवारकर यांनी म्हटले की महिला ही समाजाचा मुख्य आधारस्तंभ असुन घर,परिवार व समाज जर सुसंस्कृत करावयाची सर्वां मोठी जबाबदारी आज आपल्या वर येऊण ठेपलघ आहे आपल्या पाल्यांन सोबतच परिवाराचा योग्य सांभाळ व मार्गदर्शन करुणच समाज सुसंस्कृत होऊ शकतो.आज असे एकही क्षेत्र उरले नाही की जिथे महिलांनी अपली उपस्थिती दर्शीवली नाही प्रत्येक क्षेत्रात आजची महिला पुरुषांच्या कांद्याला कांद्दा देत देशाच्या प्रगतीत आपले योगदान देत आहेत. म्हणून कुणी काय म्हणतात याकडे लक्ष न देता आपल्याला काय आवडत याकडे लक्ष केन्द्रीत करुण आम्हाला पुढे यावे लागणार आहे.असे विचार व्यक्त केले.