शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणी रूग्णालयातील कंत्राटी कामगारांचे आंदोलन चिघळले

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणी रूग्णालयातील कंत्राटी कामगारांचे आंदोलन चिघळले

अधिष्ठाता डॉक्टर मोरे विरुद्ध मोठी कार्यवाही करण्यात यावी म्हणून मागणी होत आहे

कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे

चंद्रपूरयेथील शासकीय वैद्यकीय महाविद्मालय आणी रूग्णालयातील कंत्राटी कामंगाराचे आंदोलन गेल्या काही दिवसांपूर्वी पासूनच सुरू होते मात्र आज आंदोलन चिघळले येथील जन विकास महिला कांमगार येथील कलेक्टर गेट समोर रस्त्यावर उतरून खाली झोपून दुपारी बारा वाजता आंदोलन सुरू केले होते या आंदोलनात सहभागी मुख्य, मागणी ही होती की येथील बेजबाबदार अधिष्ठाता डॉ मोरे विरुद्ध कार्यवाही करण्यात यावी म्हणून ही मागणी धरून बसलेल्या कामगार महिला कलेक्टर गेट समोर रस्त्यावर झोपल्या होत्य मागणी धरून असता त्या महिला वर मागणीची पुर्णतेसाठी हाक या महिला देत होत्या येथील महिला पोलीस कर्मचारी .बोलावून त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला यामध्येही काही महिला दलित महिला कंत्राटी कामगार आज खरोखरच जखमी झाले आहे.
ही देखील मोठ्या त मोठी गंभीरपणे विचार करून देखील खऱ्याखुऱ्या दोशी वर कठोरपणे कारवाई करण्यात यावी महिला कंत्राटी कामगारांवर पोलिसांचा लाठीचार्ज बळाचा वापर करून आंदोलन चिरडले या अधिकारी देखील बेजबाबदार आहे .हेही तितकेच महत्त्वाचे आहे
तारा ठमके,शेवंता भालेराव इत्यादी दलित महिला कंत्राटी कामगार जखमी
डॉक्टर मोरे यांनी कंत्राट रद्द केले परंतु आंदोलनकर्त्यांना कळविले नाही त्यामुळे हे
असे बेकायदेशीर लाटिचार्ज घडण्यासाठी कोन जबाबदार आहे आणि त्या त्यांना सबक देण्याची मागणी करण्यात येत आहे
कोरोनाच्या संवेदनशील परिस्थितीमध्ये अधिष्ठाता डॉ. मोरे यांचा बेजबाबदारपणा

अधिष्ठाता डॉक्टर मोरे यांच्यामुळे आंदोलन सात दिवस लांबले
जन विकासाच्या महिला कामगार आक्रमक कलेक्टर गेट समोर रस्त्यावर झोपून दुपारी 12 वाजता आंदोलन सुरू
बेजबाबदार अधिष्ठाता डॉ. मोरे विरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी
वैद्यकीय मंत्र्यांनी 3 मार्च च्या बैठकीत कंत्राट रद्द करण्याचे आदेश दिले सात मार्चला अधिष्ठाता डॉक्टर मोरे यांनी दोन्ही कंत्राटदाराचे कंत्राट रद्द केले
1.अधिष्ठाता डाॅ एस एस मोरे व वैद्यकीय शिक्षण विभाग कंत्राटी कामगारांच्या जीवांशी खेळत आहे.
2. *बहुसंख्येने दलित-आदिवासी महिला कंत्राटी कामगार आहेत.*
3.आज आंदोलन चा 49 वा दिवस आहे.
4. सहा महिन्यापासून पत्रव्यवहार ,साखळी उपोषण ,इत्यादी आंदोलन सुरू आहेत.
5.दि. 3 मार्च 2020 रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय मुखर्जी संचालक डॉक्टर तात्यासाहेब लहाने अधिष्ठाता डॉक्टर मोरे यांची बैठक झाली व दोषी कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती सूत्रानुसार आंदोलनकर्त्यांना मिळालेली आहे.
6. *ही माहिती अजून पर्यंत डॉक्टर मोरे यांनी आंदोलनकर्त्या पर्यंत पोहोचवलेली नाही.*
7. त्यामुळे आंदोलन सुरूच आहे. याचा दुष्परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. *कोरोणाच्या संक्रमणाची भिती असतानाही अधिष्ठाता डॉ. मोरे यांचा बेजबाबदारपणा आश्चर्यचकित करणारा आहे.*
8. यापूर्वी मागील वर्षी 2 मार्च 2019 पासून किमान वेतनाच्या मागणीसाठी कामगारांनी आंदोलन केले होते. 8 मार्च 2019 रोजी शासनाने किमान वेतनाच्या निधीला शासन निर्णय घेऊन मंजुरी दिली होती. *परंतु डॉ. मोरे यांनी तेंव्हासुध्दा आंदोलनकर्त्यां पर्यंत वेळेवर माहिती पोहोचवली नाही.आणि त्यामुळे 11 मार्च 2019 पासून 15 मार्च 2019 पर्यंत दलित-आदिवासी बहुसंख्येने असलेल्या कंत्राटी कामगार महिलांनी बेमुदत उपोषण केले होते.* *डॉ. मोरे जाणीवपूर्वक आंदोलनकर्त्यांचा छळ करतात हे यातून सिद्ध होते.*
9.दोषी कंत्राटदाराचा कंत्राट रद्द झाल्याचे पत्र कंत्राटदारांना देण्यात आले.परंतु आठ दिवसापासून त्याची माहिती आंदोलनकर्त्यांना दिली नाही अशी गंभीर बाब सुद्धा माहितीस आलेली आहे.
10. शासनाने मागील वर्षी 8 मार्च 2019 किमान वेतन मंजूर केलेली असताना सुध्दा (किमान वेतनाच्या दरा पेक्षा कमी दराच्या निविदेला मंजुरी देऊन) डॉ. मोरे यांनी साडेचारशे कंत्राटी कामगारांना किमान वेतनापासून वंचित ठेवण्याचा गुन्हा केला.
11. जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष व चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी याबाबत वारंवार वैद्यकीय शिक्षण विभागाला वरिष्ठ पातळीवर कारवाई करण्यासाठी 3 वेळा प्रस्ताव पाठविला. परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाने भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या प्रस्तावाला वारंवार केराची टोपली दाखवली. त्याचप्रमाणे कामगार विभागा तर्फे प्रस्तावित कारवाईला सुद्धा केराची टोपली दाखवण्याचे काम वैद्यकीय शिक्षण विभागाने केलेले आहे.
12. नियम डावलून देण्यात आलेल्या या कंत्राटामध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाचे वरिष्ठ पातळीवरील अधिकारी, संचालक,सचिव तसेच अधिष्ठाता डाॅ.मोरे यांनी संगनमत करून भ्रष्टाचार केल्याचा जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांचा आरोप असून त्यांनी तशी *रीतसर तक्रार फौजदारी कारवाईसाठी रामनगर पोलिस स्टेशन चंद्रपूर येथे केलेली आहे.*
13. किमान वेतनापासून वंचित असलेले साडेचारशे कंत्राटी कामगार यांनी विविध आक्रमक आंदोलने करून सुद्धा शासनाने
त्यांना किमान वेतन व पाच महिन्याच्या थकीत पगार देण्याबाबत ठोस कारवाई केलेली नाही.
14.तातडीने अधिष्ठाता डॉ. मोरे यांच्या विरुद्ध कारवाईची घोषणा माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत करावी अशी आंदोलनकर्त्या दलित-आदिवासी कंत्राटी कामगार महिलांची मागणी आहे.
15. *दलित-आदिवासी* समाजातील कामगारांच्या संयमाचा अंत सरकारने पाहू नये असा इशारा सुद्धा महिला कामगारांनी दिलेला आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …