*प्रा.प्रतिभा गडवे यांना पीएचडी*
*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी- दिलीप येवले*
कोराडी:- पीएच.डीबॕरिस्टर शेषराव वानखडे कला व वाणिज्य महाविद्यालय खापरखेडा येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. प्रतिभा गडवे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने मानव्यशास्त्रे अंतर्गत राज्यशास्त्र विषयात पीएच.डी.(आचार्य पदवी) प्रदान केली.त्यांनी ” राज्य महिला आयोगाचे महिला अधिकारांचे संरक्षण व संवर्धनामध्ये योगदान-एक चिकीत्सक अध्ययन ” या विषयावर आपला शोधप्रबंध तायवाडे महाविद्यालय महादुला-कोराडी येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.वकील शेख यांच्या मार्गदर्शनात पुर्ण केला.त्यांना या बहुमूल्य कार्यात डॉ.अलका देशमूख,डॉ.शरद सांबारे, डॉ.संदिप तुंडूरवार यांनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले. यांचे सर्वांचे अभिनंदन व मनापासून आभार डॉ.प्रतिभा गडवे यांनी मानले.