*वस्तीतील चिकन सेंटर व मच्छी बजार इतरत्र हलवा*
*मुख्याधिकारी न.प.सावनेर,तहसीलदार सावनेर व वरिष्ठ अधिकार्यांना नागरिकांचे निवेदन*
सावनेर प्रतिनिधि- दिनेश चौरसीया
*सावनेर ःशहरातील मध्यभागी असलेल्या वार्ड क्र.11 जुना धान्य गंज येथील ल नागरिकांनी मुख्याधिकारी नगर परिषद सावनेर,तहसीलदार सावनेर,उप विभागीय अधिकारी सावनेर तसेच जिल्हाधिकारी साहेब नागपूर यांना सामुहीक निवेदन सादर करुण जुना धान्यगंज येथे असलेले चिकन सेंटर व मच्छी मार्केट इतरत्र हलवीयाची मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे*
*सविस्तार वु्त्त असे आहे की जुना धान्यगंज वार्ड क्र.11 येथे मागील कीत्तेक वर्षापासून उघड्यावर सदर चिकन व मच्छी मार्केट असल्याने याप्रभागात राहणाऱ्या नागरिकांना सततच्या प्रादुर्भावामुळे आपल्या व आपल्या परिवाराच्या आरोग्याची भीती तर निर्माण असतेच सोबतच चिकन व मच्छीच्या टाकाऊ मासाचे लोथड्यावर ताव मारणारे तसेच वाढत्या घाणीच्या वातावरणात मोकाट कुत्रे व त्यांचा हौदसामुळे जिव मुठीत घेऊण जीवन जगावे लागत असुन अनेकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटना सातत्याची बाब झाली आहे*
*सद्या आपल्या देशा सह संपूर्ण विवात कोरोना वायरस ची लागन झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रभात राहणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्यामुळे शासनाने सुरक्षितता बाळगन्याचे आदेश सर्व शासकीय निमशासकिय संस्थांना दिले असुन गर्दीच्या ठिकाणावर बंदी लावण्यात आली आहे सदरहू बजारात शहरातीलच नव्हे तर तालुक्यातील इतर गावातील नागरिकांची गर्दी असते व त्यामुळे कोराना साराखा आजार झपाट्याने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही*
*करिता नगर प्रशासनाने सदर चिकन व मच्छी बाजार इतरत्र हलवून प्रभागातील नागरिकांचे आरोग्य जपावे अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे*
*यापूर्वी ही प्रभागातील नागरिकांनी अनेकदा निवदेन देऊणही अद्यापही कोणतीही कु्ती नगर प्रशासनाकडून करण्यात आली नाही परंतू कोरोना वायरस च्या धसक्यात तरी नगर प्रशासन सदर चिकन व मच्छी बाजार इतत्र हलवून प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता इतरत्र हलवीते की परत नागरिकांच्या निवेदनास केराची टोपली दाखवते याकडे प्रभागातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे*