*फेक न्यूज टाकून दिशाभूल करणार्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा* *कोरोना वायरस झाल्याची पोस्ट करणार्यांच्या संखेत वाढ*

*फेक न्यूज टाकून दिशाभूल करणार्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा*

*कोरोना वायरस झाल्याची पोस्ट करणार्यांच्या संखेत वाढ*

*अश्या टवाळखोर माथेफीरुंच्या वेळीच मुसक्या आवरने गरजेचे*

मुख्य संपादक- किशोर ढूंढेले

*सावनेरः एकिकडे संपूर्ण देश कोरोना वायरस च्या रोक थाम करण्याकरिता उपाययोजना आखण्याकरिता नित नवे प्रयोग करुन वाटेल ते पाऊल उचलून सतर्कता बाळगत आहे सर्व शासकीय यंत्रना युध्द स्तरावर सदर विषाणूचे नायनाट करण्याचे काटेकोर प्रयत्नात आपला घाम गाळत आहे तर काही माथेफीरू आपल्या टवाळखोरी करुण टिव्ही न्यूज चँनल चे स्क्रिन शाँट घेऊण त्यावर आपल्या क्षेत्रात अथवा आपल्या मित्राला कोरोना वायरस झाल्याचे व त्याला नागपूर अथवा इतर ठिकाणी हलवीन्यात आल्याचे पोस्ट वाटसप,फेसबुक सारख्या सोशल मिडीया वर पोस्ट करुण जन सामान्यास भ्रमित करुण क्षणीक आनंद लुटन्याचा प्रयत्न करित आहे अश्या भ्रामक पोस्ट अपलोड करणार्यांवर शासनाच्या दिशा निर्देशानुसार गुन्हा नोंदविन्याची मागणी जोर घरु लागली आहे*

*असाच प्रकार,सावनेर, कळमेश्वर,लोधिखेडा सह अनेक ठीकाणी घडत असुन आपले अथवा आपल्या मीत्राला कोरोना वायरस झाल्या संबंधित अफवा पसवत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्मात होत असुन आपल्या क्षेत्रात कोरोना वायरस ची लागन झाली असल्याच्या चर्चा रंगु लागल्या आहे.सदर प्रकारच्या अफवा पसविने हा गंभीर गुन्हा असुन केन्द्र व राज्य शासनाने सदर प्रकारावर कुणीही भाष्य व अफवा पसरवू नये असे दिशानिर्देश देऊण अफवा पसरविणार्यावर तात्काळ गुन्हा नोंदवा असे आदेश देन्यात आले आहे तरीही असे कु्त्य सातत्याने सुरुच आहे.अश्या भ्रामक अफवामुळे एखाद्याला खरेच या विषाणूची लागन झाली असल्यास त्यासही अफवा समजून नजरअंदाज केल्याची मोठी किम्मत चुकवावी लागेल म्हणून अश्या अफवा पसरविणार्यांवर कायदेशीर रित्या गुन्हे नोंदविन्यात यावे.जेणेकरून अश्या अफवांनवर आळा बसून नागरिकात भीतीचे सावट निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी*


*महाराष्ट्र न्यूज मीडिया च्या वतीने अश्या फेक अफवा पसरवीणारे युवक युवती व त्यांच्या पालकांना विनंती आहे की आपण अश्या प्रकारे सोशल मीडिया वर कोरोना वायरस सह इतर चुकीच्या भ्रामक व अफवा पसरविणार्या पोस्ट अपलोड करुण आपल्या व आपल्या परिवारावर कटू प्रसंग ओढावून घेऊ नये*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …