*कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात आठवडी बाजार बंदीचे आदेश*
*बियर बार,वाँईन शाँप,परमिट रुम,रेस्टाँरेन्ट,क्लब,देशी दारुचे दुकान,पान ठेले आज पासूनच बंद*
*शुक्रवार चा आठवडी बाजर भरणार नाही*
*कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपक्षेत*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधी दिनेश चौरसीया सावनेर*
*सावनेर– (कोविड १९) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हा भरातील आठवडी बाजार (गुरांच्या व इतर बाजारांसह) बंद ठेवण्याबाबद नागपुर जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहे.*
*जगभर पसरलेल्या कोरोना (कोविड १९) या विषाणूचा प्रादुर्भाव महाराष्ट्रासह संपूर्ण भारत भर झालेला आहे. जगभरात लाखांच्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना (कोविड १९) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने दि. १३ मार्च २०२० पासून राज्यभरात साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ लागू केलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नगर परिषद तसेच ग्रामपंचायत क्षेत्रातील भरणारे आठवडी बाजार (गुरांच्या व इतर बाजारांसह) बंद करण्याचे आदेश नागपुर जिल्हाधिकारी कार्यालय व नगर परिषद कार्यालय सावनेर येथून देण्यात आले आहेत.यात बियर बार,वाइन शॉप,होटेल, रेस्टॉरेंट फुटफाट दुकाने,चौपाटीतली दुकाने,पान ठेले,व इतर.बंद ठेवण्याचे आदेश दीले असुन मात्र आठवडी बाजारातील जीवनावश्यक वस्तू किरकोळ स्वरूपात विकले जाऊ शकते पण अश्या ठिकाणीही विनाकारण गर्दी होणार नाही याची दक्षता सामान्य नागरिकांनी घ्यावी असेही या आदेशानुसार सांगण्यात आले आहे.*
*उपरोक्त आदेश्याचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने दंडसंहिता १८६० (४५) च्या कलम १८८ शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल.*
*कोरोना (कोविड१९)विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश वासीयांनी सहकार्य करावे अशी विनंती महाराष्ट्र न्यूज मीडिया द्वारे जन हितर्थ करण्यात येत आहे*