*कोरोना:गडचिरोली जिल्ह्यात २१ जणांना घरीच राहण्याचा सल्ला*

*कोरोना कहर:गडचिरोली जिल्ह्यात २१ जणांना घरीच राहण्याचा सल्ला*

गडचिरोली प्रतिनिधी-सूरज कुकुडकर

गडचिरोलीकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विदेशातून आलेल्या २१ जणांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला असून, सर्वांवर देखरेख ठेवण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

*श्री.सिंगला यांनी सांगितले की, जिल्ह्यातील २१ जण विदेशात गेले होते. ते परतले असून, त्यांना १४ दिवसांसाठी घरीच राहण्यास सांगण्यात आले आहे. या लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. परंतु कोरोनाच्या संसर्गाची लक्षणे १०-१४ दिवसांनंतर दिसू लागतात. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.* त्यापैकी तीन संशयितांची तपासणी केली असता वैद्यकीय अहवाल नकारात्मक आला आहे.

सर्व शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह, कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले आहेत. देसाईगंज येथील कापडांचे मॉल्स २० मार्चपासून बंद राहणार आहेत. व्यापारी संघटनेची बैठक घेण्यात आली असून, सर्वांना गर्दी टाळण्यासाठी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हॉटेल्समालकांनी घरपोच सेवा देण्यावर भर द्यावा, असे सांगण्यात आले असून, त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे पानठेले पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत, असे जिल्हाधिकारी श्री.सिंगला यांनी सांगितले.

नागरिकांनी एकमेकांना भेटताना किमान २ मीटरचे अंतर ठेवावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जिल्ह्यात कोरोनाची साथ पसरू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून, प्रशासन त्यासाठी पूर्णवेळ काम करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी श्री.सिंगला यांनी कोरोनाची जगभरातील स्थिती, देश व राज्यातील आकडेवारी, कोरोना विषाणूचे दुष्परिणाम व ते पसरण्याचा वेग इत्यादी बाबींविषयीही अवगत केले. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.विजय राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …