कोरोना गो ‘ विषारी रोगा पासून बचाव करिता सॅनिटायझरचे वाटप अभिनव उपक्रम:सावनेरकारांचा चा पुढाकार…
नगरसेवक तुषार उमाटे यांच्या कडून सॅनिटायझरचे वाटप
सावनेर प्रतिनिधि- सूरज सेलकर
सावनेर– सावनेर चे नगरसेवक तुषार उमाटे यांचा कडून कोरोना वायरस चा संसर्ग रोखण्यासाठी आपल्या वार्डमध्ये प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझर वाटप केले. शहर मध्ये सॅनिटायझर साहित्य वाटप करणारी एकमेव नगरसेवक आहे .
तुषार उमाठे यांनी सावनेर शहर कोरोना विषाणू मुक्त करण्यासाठी , लोकांनी आरोग्याची स्वतःची घ्यावी यासाठी पुढाकार घेतला .
शहर मध्ये त्यांनी आपली स्वतःची टीम तयार करण्यात आली. यात रिंकेश उमाटे, संजय रोकडे, प्रशांत घोळसे, अमन करोले, सागर महतपुरे, रितेश बनकर, जगदीश सातपुते आदींचा टीममध्ये समावेश करण्यातआला होता .
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे.बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांकडे विशेष लक्ष देण्यासाठी काही तरुणांची समिती तयार करण्यात आली आहे .
याप्रसंगी गावकऱ्यांना घरासमोर बादली व साबुन ठेऊन घरी येणाऱ्यांनी हात धुवून घरात प्रवेश देण्यात यावा . तसेच वैयक्तिक स्वच्छता,घराची स्वछता, सार्वजनिक ठिकाण स्वच्छता, दरवाजे, हॅन्डल, स्वछता, मोटरसायकल हॅण्डल स्वच्छता इत्यादी बाबी नागरिकांहा समजावून सांगन्यात आले. कोरोनाचे दुष्परिणाम सांगण्यात आले. प्रत्येक नागरिक स्वतःची काळजी घेत आहेत काय याची माहिती देणार आहेत . कोरोना वायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी तथापि , कोरोना विषय अतिशय गंभीरपणे हाताळणी करायची आहे हे सांगितले.