संपूर्ण देश आज मध्यरात्रीपासून २१ दिवस लॉकडाऊन – पंतप्रधान मोदींची घोषणा

संपूर्ण देश आज मध्यरात्रीपासून २१ दिवस लॉकडाऊन –पंतप्रधान मोदींची घोषणा

 

महाराष्ट्र न्यूज़ मीडिया सेवा

नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा जनतेला संबोधित केले. कोरोनापासून बचावासाठी कोणताही मार्ग नाही. जगातील अनेक देश कोरोनासमोर हतबल झाले आहेत. यासाठी संपूर्ण देशात आज रात्री १२ वाजल्यापासून लॉकडाऊन करण्यात येत आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.


गेल्या २ दिवसांपासून देशातील अनेक भागांत लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्य सरकारांनी हे प्रयत्न गांभीर्याने घेतले पाहिजेत. या लॉकडाऊनची देशाला एक आर्थिक किंमत मोजावी लागणार आहे. मात्र, सध्यस्थितीला प्रत्येक भारतीयाचे जीवन वाचविणे ही भारत सरकारची, देशातील प्रत्येक राज्यांची सर्वात मोठी प्राथमिकता आहे, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

या काळात तुम्ही घरातच रहा. सोशल डिस्टन्सिंग हा कोरोनापासून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे. मला विश्वास आहे की देशवासीय या संकटाचा यशस्वीपणे सामना करतील. तसेच या कठीण परिस्थितीवर मात करून बाहेर पडतील, असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

चीन, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इराण सारख्या देशांत जेव्हा कोरोनाचा फैलाव झाला त्यावेळी तेथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. इटली आणि अमेरिकेची आरोग्य सेवा जगभरात प्रभावी मानली जाते. तरीही तेथे कोरोनाचा फैलाव रोखता आला नाही. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश आज रात्री १२ वाजल्यापासून लॉकडाऊन केला जात आहे. हा एक प्रकारचा कफ्यू आहे. हे लॉकडाऊन तीन आठवड्याचे म्हणजे २१ दिवसांचे आहे, असे मोदींनी सांगितले.

२१ दिवसांत कोरोना संपुष्टात आला नाही तर अनर्थ होईल, अशी चिंता देखील पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. आपल्या घरीच थांबा. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …