मोवाड शहरात २१ दिवसाच्या लाँकडाऊनला काटेकोर पालनास सुरुवात
मोवाड प्रतिनिधि- श्रीकात मालधुरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण भारतात कोरोना या विषाणूला रोखण्यासाठी २१ दिवसाचे लाँकडाउन केले आहेत याचे काटेकोर पालन वावेत म्हणून मोवाड नगरपरिषद कडून व प्राथमिक आरोग्य केन्द्र यांच्या कडून तसेच पोलीस चौकी मोवाड कडून मोवाडातील जनतेला कोरोना विषाणू ला रोखणे साठी १)आपल्या हाताना वारंवार साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा २)वापर झालेल्या टिशूला तक्ताळ बंद असलेल्या कचरापेटीत टाका ३)साबुन आणि पाणी उपलब्ध नसेल तर किमान ६०टक्के अलकोहोल असलेल्या हँड सँनिटायझरचा वापर करा ४)शिकताना व खोकलताना आपल्या नाक व तोडावर रूमाल व टीशु ठेवा ५)आपल्या डोळे ,नाक व तोंडाला स्पर्श करण्यापुवी हात स्वच्छा धुवावे ६)सामाजिक कार्यक्रम आणि गदीच्या ठिकाणापासून स्वतःला दुर ठेवा जर तुम्हाला ताप ,खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास या सारखे लक्षण वाटत असेल तर डॉक्टरची मदत घावीत अशा प्रकारची सुचना मोवाड घंटागाडी वरुन दिले जातात व गरज नसताना विनाकारण घरा बाहेर निघु नयेत असे कडक आदेश स्थानिक पोलिस व नगरपरिषदे कडून दिले जात आहेत या करीता मोवाड शहरातील नरखेड रस्ता व पाढुणा रस्ता व जलाखेडा रस्ता हे मोवाड शहरात येनारे मार्ग स्वयंसेवक युवा तरुण माहिती घेत आहे तसेच आज गुढीपाडवा मराठी वर्षीचा पहिल्या दिवस व मोवाड बुधवारी आठवडी बाजारात पुर्णतः बंद होता तसेच मोवाड प्रथमिक आरोग्य केन्द्र कडून मोटार वाहन मधून लोकांना च्या आरोग्यची पाहनी अबुलनस फिरविली जाते