गडचिरोली जिल्हयात करोना विषाणू संसर्गाच्या धर्तीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने संचार बंदी लागू झाली

 

गडचिरोली जिल्हयात करोना विषाणू संसर्गाच्या धर्तीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने संचार बंदी लागू झाली

गडचिरोली प्रतिनिधी-सूरज कुकुडकर

गडचिरोली : राज्यासह गडचिरोली जिल्हयात करोना विषाणू संसर्गाच्या धर्तीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने संचार बंदी लागू झाली आहे. यानुसार जिल्ह्यात येणारी आंतरराज्यीय व आंतर जिल्हयातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र त्यामधून पेट्रोलियम पदार्थ, दुध, भाजीपाला, औषधी, धान्य, वैद्यकीय उपकरणे तथा जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे. नागरिकांनी काळजी न करता प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करून घरीच रहावे. प्रशासन जीवनावश्यक बाबी वगळून संसर्ग रोखण्यासाठी संचार बंदी लागू करत आहे. कोणीही न घाबरता करोना संसर्ग साखळी खंडीत करण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. याचबरोबर जिल्हयातील जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती उद्योग करणारे व्यवसाय वगळता इतर सर्व उद्योग धंदे तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोना बाधित परदेशातून आलेल्यांची शोधमोहिम
कोरोना लागण संसर्गावर उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली २० मार्चपासून कोरोना बाधित प्रदेशातून आलेल्या नागरिकांची शोधमोहिम राबविली जात आहे. या लोकांच्या घरी जावून प्रशासन आवश्यक सूचना देत आहेत. तसेच त्यांच्या घराच्या दरवाजावर अ, ब व क प्रमाणे स्टीकर लावणार आहेत. यातून सदर व्यक्तीवर नजर ठेवून लक्षणांची तपासणी केली जाणार आहे. यामुळे निश्चित करोना संसर्ग साखळी तोडण्यास मदत होणार आहे. यावेळी प्रवाशाच्या डाव्या हातावर होम क्वारंटाईन नावाचा व दिनांक असलेला शिक्का मारला जाणार आहे.
जिल्हयात १५ घरीच तर २ दवाखान्यात क्वारंटाईन
कोरोना बाधित संसर्ग तोडण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमध्ये बाहेरून आलेल्या ३६ लोकांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यातील ९ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील ७ निगेटीव्ह तर २ अहवाल अजून येणे बाकी आहे. ३६ पैकी निरीक्षण कालावधी संपून १९ लोकांना क्वारंटाईनमधून बाहेर घेण्यात आले आहे. आता घरी १५ तर दवाखान्यात २ अशे मिळून १७ लोक क्वारंटाईनमध्ये आहेत.

*जिल्हा माहिती कार्यालयाच्या नावाने व्हायरल बातमी खोटी*
जिल्हाधिकारी यांच्या नावे व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या मार्फत फिरणारी सोशल मिडीयावरील वृत्तपत्र बंद करा, जीवनावश्यक वस्तूंचा साठा करा. तसेच दुधाच्या पिशव्यांबाबतची चुकीची पोस्ट खोटी असून ती कोणीही पुढे पाठवू नये, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली यांच्याकडून करण्यात येत आहे. यवतमाळमध्ये याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या बाबींबर विश्वास ठेवू नये, असेही आवाहन करण्यात येत आहे.

संचार बंदीनंतर काय सुरू आणि काय बंद
*हे बंद राहणार – महाराष्ट्रात येणाऱ्य सर्व सीमा बंद, आंतर जिल्हा सीमाही बंद यामुळे बाहेरून येणारे करोना बाधित रूग्णांच्या फिरण्यावर आळा बसेल. तसेच जिल्हयातील संसर्ग बाहेर जाणार नाही व इतर ठिकाणचा आत येणार नाही.*
*हे सुरू राहणार : जीवनावश्यक वस्तू, औषधे, औषधे निर्माण करणारे कारखाने, दूध, बेकरी, कृषी उद्योगाशी संबंधित दुकाने, पशु वैद्यकीय दवाखाने व पशुखाद्य दुकाने, तसेच याबाबत आवश्यक वाहतूक सुरू राहणार आहे.*

याबरोबरच आत्यावश्यक सेवेसाठी खाजगी वाहने रस्त्यावर उतरतील. गर्दी होणार नाही यासाठी सहकार्य करा अन्यथा कारवाई होणार : गर्दी स्वत:हून न होण्यासाठी नागरीकांना प्रयत्न करावेत. तसेच लोक सार्वजनिक ठिकाणी येवून गर्दी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. काम नसताना विनाकारण एकाही व्यक्तीला फिरण्यास मनाई आहे. या सूचनांचे नागरीकांनी पालन करावे. अन्यथा नाईलाजास्तव प्रशासनाला कारवाई करावी लागेल अशा सूचनाही राज्य शासनाकडून करण्यात आल्या आहेत. गडचिरोलीत एकही पॉझिटीव्ह रूग्ण नसला तरी काळजी करणे आवश्यकच : जिल्हयात अद्याप एकही करोना बाधित रूग्ण नसला तरी सर्वांनी आवश्यक खबरदारी घेणे आवश्यकच असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. जिल्हयाच्या बाहेरून कित्येक नागरीक गेल्या १५ दिवसांमध्ये आलेले आहेत. करोनाची लक्षणे उशिरा दिसत असल्याने या सर्व लोकांवर प्रशासन लक्ष ठवेून आहे. बाहेरून आलेल्या सर्वच नागरिकांनी घरीच राहून आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …