कुहीत लॉकडाऊन की अपडाऊन !
कुही प्रतिनिधि- निखिल खराबे
कुही:– कोरोना वायरस च्या वाढत्या संसर्गामुळे आधी राज्य सरकारने संचारबंदी लागू केली त्यानंतर देशभर केंद्र सरकारने 21 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली पण कुही तालुक्यात दुचाकीस्वारांवर अद्याप लगाम लागलेली दिसत नाही.
नागपुरात काल व आज दिवसभर पोलिसांतर्फे रस्त्यावर विना कामाने फिरणाऱ्यांना चांगलाच चोप दिला जात असल्याचे अनेक विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे पण या गोष्टींच्या विरोधी चित्र कुही तालुक्यातील रस्त्यांवर दिसताहेत.
सगळीकडे बंद चे चित्र असताना मात्र दुचाकी वाहने रस्त्याने मोठ्या संख्येने दिसत आहेत.
त्यांना लगाम लागणार का ? दुचाकी वाहने बंद करून पंतप्रधान मोदींच्या बंद ला खऱ्या अर्थाने सार्थक करता येईल का असा सवाल तालुक्यात सध्या चर्चेचा विषय आहे.