*मीडिया प्रतिनिधी जोपासली सामाजिक बांधिलकी* *गर्दीच्या ठीकाणी कोरोना वायरस चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे ओढल्या लक्ष्मण रेषा*

*मीडिया प्रतिनिधी जोपासली सामाजिक बांधिलकी*

*गर्दीच्या ठीकाणी कोरोना वायरस चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे ओढल्या लक्ष्मण रेषा*

*सावनेरः कोरोना वायरस च्या विषाणूंचा प्रादुर्भाव गर्दीच्या ठीकाणी जास्त प्रमाणात होऊ शकतो म्हणून शासन सर्वच स्तरावरुन गर्दी टाळण्यासाठी जमावबंदी कायदा 144 सोबतच संचारबंदी सारखे करडे पाऊल उचलत आहे.तरीपण भाजीमंडी,शासकीय आरोग्य केन्द्र आदि ठीकाणी या विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता तज्ञ चिकित्सकांनी सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सुचना दिल्या असुन सुध्दा नागरिक यांचे पालन करत नसल्याचे दिसत येत असल्याने देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी नागरिकांना स्वतःच्या आजुबाजुला लक्ष्मण रेषा ओढण्याचे आव्हान केले आहे सदर बाब हेरून सावनेर तालुका मीडिया प्रतिनिधीं किशोर ढुंढेले,पीयूष झिंजुवाडीया,विजय पांडे,रवी काळबांडे,सुरज सेलकर,दिनेश चौरसीया आदींनी शहरातील प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर येथे पोहचून बाह्यरुग्ण विभाग,औषध वितरण कक्ष,नोंदणी कक्ष,अस्थाई कोरोना वायरस तपासणी कक्ष इत्यादी ठिकाणी अंदाजे दीड मीटर सुरक्षित अंतरावर चुन्यानी गोल वर्तुळ आखून उपचाराकरिता येणार्या रुग्णांकरिता सुरक्षित अंतर ठेवण्यास उपयुक्त ठेवणार्या या कु्त्याची सर्वत्र प्रशंसा करत आहे*


*या प्रसंगी डॉ. बनसोडे,घनश्याम तुर्के सह प्राथमिक आरोग्य केन्द्राच्यख परिचारिका आदींनी मिडीया टीमच्या प्रतिनिधींच्या सदर कार्याचे कौतुक करित आभार व्यक्त केले*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …