*पाटणसावंगी परीसरात 44 नागरिक होम क्वारनटाईन*
*14 दिवस घरातच राहण्याच्या सुचना*
सावनेर तालुका प्रतिनिधी -विनोद वासाडे
*पाटणसावंगी– येथील परिसरातील 44 नागरिकांना होम क्वारनटाईन करण्यात आले आहे हे नागरिक हैदराबाद, पुणे, मुंबई, चेन्नई, इंदोर, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आदी ठिकाणाहून आले आहे.*
*कोरोना च्या पार्श्वभूमीवर पाटणसावंगी परिसरातील गावांमध्ये बाहेरुन आलेल्या नागरिकांचा शोध ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस प्रशासना मार्फत शोध घेण्यात आला.त्यामध्ये पाटणसावंगी 23, चानपा 7, सावरमेंढा 2, ब्रम्हपुरी 3, सिल्लोरी 1, वाकी 5,भेंडाळा 2, वेलतुर 1 असे आढळुन आले असून त्या सर्वांची येथील. प्राथमिक आरोग्य केंद्र पाटणसावंगी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना त्यांच्या घरामध्ये 14 दिवस होम क्वारनटाईन होण्याची सूचना देण्यात आली. या सर्वांमध्ये एकही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आला नाही. होम क्वारनटाईन झालेल्या व्यक्तींची प्राथमिक तपासणी करुन त्यांच्या हातावर स्टॅम्प लावण्यात आला असून त्यांच्या संपर्कात आमचे आरोग्य कर्मचारी असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ अनुपमा मेश्राम यांनी सांगितले*