*माणुसकी जिंवत राहावी जनसेवा हीच ईश्वर सेवा*
*मेडिकल हॉस्पिटल येथे अन्न दान*
नागपूर प्रतिनिधी- ज्योत्सना इंगळे
नागपुर– नागपूर दररोज प्रमाणे आजही वसुंधरा सोशल फाऊंडेशन टीमच्या पुढाकाराने मेडिकल हॉस्पिटल येथील गरजुवंतांना मसाले भात, पुरी – भाजी आणि पाणी वाटप करण्यात आले. येथे अँडमिट पेशन्ट जे बाहेरगावचे आहेत तसेच त्यांचे नातेवाईक या लोकांना जेवायला मिळत नव्हते अशा गरजु लोकांपर्यंत हि वसुंधरा सोशल टिम पोहचुन त्यांना जी जमेल ती मदत केली. कोरोना काय आज आहे उद्या निघून जाईल परंतु, माणुसकी जिवंत राहावी यासाठीच दररोज वसुंधरा टीम ही सेवा आणि सहकार्य करत आहे.
वसुंधरा टीम कार्यास सलाम….
आज या अन्नदान वाटपात दक्षिण नागपूर प्रभाग क्रमांक 34 योग शिक्षिका ज्योत्स्ना ताई इंगळे, वसुंधरा सोशल फाऊंडेशन अध्यक्ष समीर काळे, सहप्रमुख मनीष धकाते,मयूर खोरगडे, शुभम राऊत, वैभव आबदेव, यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडली.