अंदाज अचूक ठरला, जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदारांकडून नागरिकांची सर्रास लूट, कोरपना तालुक्यात सोनुर्ली येथून सुरवात

अंदाज अचूक ठरला, जिल्ह्यातील रास्तभाव दुकानदारांकडून नागरिकांची सर्रास लूट, कोरपना तालुक्यात सोनुर्ली येथून सुरवात

या कोरपना तालूक्यातील हा सावळागोंधळ
नेहमीप्रमाणे आहे .

कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे

कोरपन :-एकिकडे दुष्परिणाम होत आहे आणि कोरोना विषाणूने राज्यात हाहाकार माजविला असून देशात लाकडाऊन करण्यात आले आहे संचारबंदी असल्याने राज्य शासनाने अन्नधान्याचा तुटवडा पडू नये गैरसोय टाळता यावी म्हणून एप्रिल , मे व जून या तीनही महिन्याचे धान्य एकत्रित वाटप करण्याचा निर्णय घेतला असून तात्काळ अमलबजावणी करण्यात येत आहे सोनुर्ली येथील रास्तभाव दुकानदारांकडून आज धान्य वाटप करण्यात आले असून अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना २९०/- रुपयात ६० किलो तांदूळ , ४५ किलो गहू व १ किलो साखर वाटप गरजेचे असतांना ४५ किलोे तांदूळ ४५ किलो गहू १ किलो साखर एवढेच धान्य देऊन ५००/ रुपये घेऊन धान्य वाटप केले आहे सोनुर्ली येथील रास्तभाव दुकानदारांकडून आपत्तीच्या काळात सर्रास लूट करण्यात येत असून काळाबाजारी केली जात आहे तालुक्यातील अनेक रास्तभाव दुकानदारांकडून मोठी लूट होऊ शकते याकरीता वेळीच तहसीलदार व पुरवठा अधिकाऱ्यांनी तात्काळ याकडे गांभीर्याने लक्ष देऊन काळाबाजारी करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करुन परवाने रद्द करून फौजदारी कारवाई करणे गरजेचे आहे सोनुर्ली येथील शिधापत्रिकाधारकांनी लुट करण्यात येत असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिले असून कोरपनाचे तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी सोनुर्ली येथे भेट देऊन कारवाई करणार असल्याचे शिधापत्रिकाधारकांना सांगितले असून आता पोलीस कर्मचारी हजर ठेऊन नियमान्वये धान्य वाटप करायला लावले आहे जिल्हा प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास मोठी लुट होणार हे मात्र निश्चीत आहे

सोनुर्ली येथील रास्तभाव दुकानदार धान्य उचल केल्यानंतर कधीच कोणत्याही ग्राहकाला धान्याचे बिल देत नाही अनेक वर्षांपासून सर्रास लूट सुरू आहे कोरपना तालुक्याचा पुरवठा विभाग दुर्लक्ष करीत असल्याने राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असतांनाही या ठिकाणी आज रास्तभाव दुकानदाराने मोठ्या प्रमाणात सर्रास लूट केली आहे तहसीलदारांनी आज भेट दिली परंतु रास्त भाव दुकान सील करून कारवाई करणे गरजेचे होते.

 

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …