महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ नुसार कार्यवाही करण्यात येईल
संचारबंदी चे /लाँकडाऊन उल्लंघन होणार नाही
यांची सर्वत्र नागरिक/संबंधित ग्रुप अँडमीन यांनी
संचारबंदी च कसलेही उल्लंघन होणार नाही खबरदारी घ्यावी
विशेष प्रतिनिधि- गौतम धोटे
कोरपना :- दिनांक १ एप्रिल २०२० रोजी बहुतांश लोक आपले नातेवाईक, मित्र परिवार व हितसंबधीतांना एप्रिल फुल करीत असतात. त्यातुन एक वेगळा प्रकारचा आनंद मिळत असतो. परंतु सद्यस्थितीत आपण कोरोना व्हायरस (COVID- 19) च्या संकटाशी सामना करीत आहोत. यासंदर्भाने शासनाकडन संपुर्ण देशामध्ये दिनांक २५ मार्च २०२० पासुन २१ दिवस लॉकडाउन घोषीत करून संचारबंदी केलेली आहे.
यामुळे नागरीकांनी कोरोना व्हायरस (COVID- 19) च्या संदर्भाने लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचे संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारचे मॅसेजेस/पोस्ट/फोटो/व्हिडीओ सोशल मिडियावर (फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इंस्टाग्राम, टिकटॉक व इतर सोशल मिडीया माध्यमे) पोस्ट अथवा सेंड करून नये, तसेच सोशल मिडीयावर व्हायरल करू नये. जेणेकरून जनमाणसांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होउन संचारबंदी/लॉकडाउन चे उल्लंघन होणार नाही. तसेच प्रशासनावर ताण पडणार नाही व कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
याद्वारे चंद्रपुर जिल्हयातील सर्व नागरीकांना निर्देश देण्यात येते की, कोरोना विषाणु (COVID- 19) च्या संदर्भाने खोटे मॅसेजेस किंवा अफवा सोशल मिडीयावर पसरविल्यास/व्हायरल करणारा व संबंधीत ग्रुप अॅडमीन यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ नुसार प्रतिबंध करीत आहे. असे कत्य केल्यास आपल्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४० सह भारतीय दंड संहिता कलम १८८ व इतर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार गुन्हा नोंद करण्यात येईल,
टिपः ग्रुप अॅडमिनने तात्काळ आपल्या ग्रुप मधील सर्व ग्रुप मधील सदस्यांना सुचना दयाव्यात. तसेच सेटिंग मध्ये जावुन फक्त ग्रुप अॅडमिन मॅसेज सेंड करेल अशी सेटींग करावी.(आणी व्हाट्सएपच्या आदी वरिल खोट्या संदेशापासून आपन सावद रहाव .