*पारधी बेडयावरील मोहफुल दारू भट्टीवर धाड*
*महिलेसह आठ जणांना अटक*
*3820 लिटर मोहफुल सडवा व दारू सह साडे आठ लाख रुपयाचा ऐवज जप्त*
*विशेष प्रतिनिधी मुशीर सैय्यद कळमेश्वर*
*कळमेश्वरः स्थानिक पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोंडखैरी येथील मोहफुल दारूच्या भट्टीवर पोलिसानी धाड टाकून ती नष्ट केली़ या प्रकरणी एका महिलेसह आठ जणांना अटक करण्यात आली़ तर 3820 लिटर मोहफुल सडवा व दारू असे आठ लाख पन्नास हजार रुपयाचे साहित्य जप्त करण्यात आली़ ही कारवाई सोमवारी सांयकाळी करण्यात आली़ अंकुश पवार, अमर पवार, देविदास पवार, सतीश माळी, बाजीराव भोसले, संगीत पवार, लखन भोसले व पंचफुला मारवाडी सर्व रा़ गौंडखैरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.*
*गोंडखैरी येथील पारधी बेडयावर काही व्यक्ती हातभट्टी लावून मोहफुलाची दारू काढत असल्याची माहिती कळमेश्वर पोलिसांना मिळाली होती़ याच माहितीच्या आधारे ठाणेदार मारुती मुळुक यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक खडसे, सहायक पोलिस निरीक्षक कर्मलवार, पोलिस उपनिरीक्षक गावंडे, सहायक फौजदार सपाटे, पोलिस हेडकॉन्स्टेबल मन्नाम नोरंगाबादे व इतर कर्मचाऱ्यांनी पारधी बेड्यावर धाड टाकली़ येथे आरोपी लोखंडी ड्रममध्ये मोहफुलाची दारू काढतानी आढळून आले़ पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून गावठी दारू व मोहफुल सडवा 3820 लिटर व दारू बनविण्याचे साहित्य जप्त केले़ याप्रकरणी सर्व आरोपींवर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले़ सीएसाठी नमुने काढून उर्वरीत मुद्देमाल कारवाईच्या ठिकाणीच नष्ट करण्यात आला़*