जिल्हयाबाहेरून आलेल्या १४ हजार २८७ नागरिकांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के*
गडचिरोली प्रतिनिधी-सूरज कुकुडकर
गडचिरोली: जिल्ह्यात बाहेरून आलेल्या १४ हजार २८७ नागरिकांना संचारबंदीच्या काळात बाहेर न पडता घरात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे; या सर्वांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले आहेत. त्यांच्यावर कोरोना संसर्ग लक्षणांबाबत निरीक्षण ठेवले जात आहे.
त्यांनी गृह विलगीकरणात राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात बाहेंरुन आलेल्या १५५२ नागरिकांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. आतापर्यंत गडचिरोली तालुक्यात १८८६,आरमोरी-१५४०, देसाईगंज-८९१, कुरखेडा-८२५, कोरची-७२६, धानोरा-८०४, चामोर्शी- २८७१, मुलचेरा-१५८७, एटापल्ली-१५०, अहेरी-१८५७, भामरागड-५४५, सिरोंचा-६२५ जणांच्या हातावर शिक्के मारुन त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.