*”निवारा” येथे परप्रांतीय प्रवासी कामगारांना आपुलकीची उब*
*वैधकीय सेवे सोबतच राहण्याची व जेवणाची सोय*
*प्रतिनिधी दिनेश चौरसीया सावनेर*
*सावनेरः लॉयन्स क्लब सावनेर, पोलीस स्टेशन सावनेर आणि नगरपरिषद सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सावनेर नगर परिषद हायस्कुल येथे ‘निवारा’ या शीर्षकाखाली शेल्टर हाऊस चे निर्माण करण्यात आले.*
*कोरोना विषाणूने सध्या स्थितीत संपूर्ण जगभर जो थैमान घातला आहे त्यामुळे भारतात लॉकडाऊन करण्यात आले आहे परिणामी हातावर पोट असलेल्या कष्टकरी बांधवांचा तांडा परिवाहनाची सोय नसल्याने पायीच कित्येक मैलांचा प्रवास करून आपल्या घरी निघाला.अश्याच कष्टकरी बांधवांसाठी सावनेरचे मुख्याधिकारी रवींद्र भेलावे,लॉयन्स क्लब सावनेर,पोलीस स्टेशन सावनेर,नगरपरिषद सावनेर यांच्या माध्यमातून शेल्टर हाऊस चे निर्माण करून त्यात सदर कष्टकरी बांधवांसाठी राहण्याची ,जेवणाची,तसेच वैद्यकीय सोय करण्यात आल्याची माहिती सावनेरचे पोलीस निरीक्षक,लॉयन्स क्लब चे अध्यक्ष वत्सल बांगरे,सचिव किशोर सावल यांनी दिली.सदर शेलटर हाऊस मध्ये लॉयन्स क्लब चे डॉ.परेश झोपे,डॉ. शिवम पुण्यानी,डॉ.छत्रपती मानापुरे,डॉ.अमित बाहेती वैद्यकीय सेवा पुरवीत आहेत.*
*तर सदर शल्टर हाऊस ला लायंन्स क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहे*