*माणूसकी जीवंत आहे*
*संग्रामपूर मित्र परिवारातर्फे शहरातील 750 गरीब गरजूंना मदतीचा हात*
*विशेष जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा*
*संग्रामपूर आपल्या देशासह राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारकडून लोक डाऊन ची घोषणा करण्यात आली त्यामुळे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांच रोजगार हिरावला आहे .सध्याच्या परिस्थितीत अशा मजूर व गरिबांवर उपासमारीची पाळी आली आहे . आपल्या हातावर पोट असलेल्या शेतमजूर व त्यांच्या कुटुंबांना याची मोठी झळ बसत आहे. ही स्थिती पाहता संग्रामपूर शहरातील मित्रपरिवाराने आपल्या स्वःखर्चाने संपूर्ण शहरातील गरीब व गरजू अशा साडेसातशे कुटुंबांना धान्य वाटप करून त्यांना एक दिलासा दिलेला आहे*
*22 मार्च पासून भारत तथा महाराष्ट्रात लॉक डाऊन झाल्यामुळे मजूर गोर गरिब तसेच प्रत्येकाचे कामधंदे ठप्प झाले असून ज्या मजुरांची आपल्या हातावर पोट होते त्यांची उपासमारीची पाळी आल्याचे चित्र दिसून येताच संग्रामपूर मित्रपरिवाराने त्या कुटुंबाला प्रत्येकी चार किलो गहू, एक किलो दाळ , एक मिठाचे पाकीट ,एक किलो तेल असे साडेसातशे कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचा वाटप केल आहे. सदर साहित्याचे वाटप संग्रामपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे व पीएसआय श्रीकांत विखे यांच्या हस्ते सर्वप्रथम वाटप करून त्यानंतर मित्रपरिवाराने संपूर्ण गावात सदर परिवारांना हे धान्याचे वाटप केले आहे.*
*या गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचा वाटप केल्यामुळे त्यांच्या कुटुंबातही अशा परिस्थितीत मिळालेल्या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाल्याचे दिसून आले*
*संग्रामपूर मित्र परिवारामध्ये राहुल शिरसोले ,अनिल वानखडे,अनिस होमगार्ड ,शेख रशीद,विजू आकोटकर ,वैभव गायकी ,हमीद पाशा ,आसिफ खान बंटी गायकी या मित्र परिवाराने घरोघरी जाऊन धान्याचे वाटप करून त्यांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे तसेच घरात प्रवेश केल्यावर आपले हात साबणाने स्वच्छ धुण्याचे ही सूचना दिले.*