रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या वर जप्तीचे
आणी दंडात्मक कारवाईचे आदेश
अकारण फिरत असल्यामुळे कायद्माचे
उल्लंघन होताना दिसून येत आहे
विशेष प्रतिनिधि-गौतम धोटे
कोरपना :- 1 एप्रिल पासून जिल्हाधिकाऱ्यांनी शहरांच्या रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर वाहनधारकांवर जप्ती आणि दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.मात्र तरीही ठाणे गडचांदूर पोलीसांनी आवारपूर/नादाफाटा येथील काही नागरिकाना कारवाईचा इशारा देऊनही रस्त्यावर अकारण फिरत आहोत त्यावर कारवाई होताना दिसत नाही हे सर्व अवघळच असल्याचे
बोलले जात आहे
त्यामुळे (1 एप्रिल पासून) जिल्हाधिकाऱ्यांनी शहरांच्या रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर वाहनधारकांवर जप्ती आणि दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी आदेशाची अंमलबजावणी सुरु केली.
यानंतर पोलिसांनी काही तासातच जवळपास 470 वाहनधारकांना दंड आकारला. तर 100 वाहने जप्त करण्यात आली. तसेच अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना वैध ओळखपत्र असल्यास सोडले जात आहे. तर हे ओळखपत्र नसलेल्या वाहनधारकाना दंड केला जात आहे.