*महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवर शुकशुकाट*
*पदाचारी कामगारांना “नीवारा” शटलर होम चा आधार*
*सामाजिक संस्था, समाजसेवी व मानवतेच्या भारावर शेकडो मैलाचा प्रवास हसत खेळत*
*इथेच वास्तव्य करा पोलीस प्रशासन व शासन आपणास कोणतीही कमतरता भासु देणार नाही*
-(राकेश ओला,पो.अधिक्षक नागपूर ग्रामीण)
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत,प्रतिनिधी सुरज सेलकर व दिनेश चौरसीया सावनेर*
*सावनेरः कोरोना वायरस या संसर्गजन्य विषाणूच्या धास्तीने मागील 15 दिवसापासून संपूर्ण देशात संचारबंदी लागू असून शाळा,विध्यालय,कारखाने, खाजगी व शासकीय विकास कामांना खीळ बसली असुन संपूर्ण देशातील नागरिकांची पाऊलं स्वतःला आप आपल्या घरी अघोषित अदु्ष्य बेड्या (लाँकडाऊन) करुन घेण्यास बाध्य आहे अश्यातच देशातल्या महत्वाच्या परिवहन व्यवस्था रेल्वे व राज्य परिवहनाचे चाक सुध्दा फीरत नसल्याने पोटाची खडगी भरण्यासाठी कामाच्या शोधात परप्रांतात आलेल्या कामगारांना त्यांच्या कांत्रटदारांनी वार्यावर सोडून दील्याने आता त्यांना आपल्या पोटाची खडगी भरणे सुध्दा कठीण होत आहे व आप्त परिवारात पोहचण्याच्या नादात हे कामगार आता आपल्या परिवारासोबत हजारो मैलाचा आपल्या सर्व वेदना सुखःदुखः विसरून हा प्रवास हसत खेळत पायी पुर्ण करण्यास विवश होत आहेत या प्रवासात त्यांना उन,पाऊस, तहान,भुक़,निवारा अश्या भरपूर समस्यांना तोंड़ देत आपला प्रवास पुर्ण करावा लागत आहे आश्यात धन्य ते सामाजसेवी व त्या समाजसेवी संस्था व कर्तव्यदक्ष माणूसकीची कास धरणारे अधिकारी कर्यचारी*
*महाराष्ट्रातून या सीमे वरून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान,बिहार येथे चार हजार कामगारांचे पलायन*
*महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवरील शेवटचा तालुका म्हणजे सावनेर अश्याच दोन राज्याला जोडणारी सीमा म्हणजे “केळवद पोलीस स्टेशन” अंतर्गत येणारे सातनूर या सीमेवर आमचे स्थानिक प्रतिनिधी यांनी पोहचून स्थीतीची पाहणी केली असता संपूर्ण सीमा बंद असुन आवागमनावर दोन्हीही राज्याने बंदी लावली असल्याने शुकशुकाट असुन तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस व आरोग्य अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधला असता लाँकडाऊन जरी पूर्णतः यशस्वी होत असला तरी महाराष्ट्रातून मध्यप्रदेश,उत्तरप्रदेश,बिहार,राजस्थान इत्यादी राज्याला पायी आपल्या घरी निघालेल्या जवळपास चार हजाराच्या वर कामगारांच्या तपासणी झाल्याचे वु्त्त आहे*
*सामाजिक संस्था व समाज सेवींचाच आधार*
*दिवस भराचा प्रवास तर परिवारासोबत हसत खेळत नित नवे अनुभव उराशी बागळत रात्रीला जेवणाची सोय व सुरक्षित निवांत निवारा मीळणार की नाही अश्या व्दंदात रात्रीचा वाढता काळोख बघून रात्र काढण्याचा विचारात ओडोसा शोधून कशीबशी रात्र काढु पाहणार्या पदाचारी कामगारांना सावनेर येथे लाँयन्स क्लब चे अध्यक्ष वत्सल्य बांगरे,सचिव किशोर सावल,डॉ. शीवम पुण्यानी, डॉ. परेश झोपे,डाँ छत्रपती मानापुरे,डॉ. अमित बाहेती,राजु पुण्यानी व सहकारी,रविन्द्र भेलावे मुख्याधिकारी नगर परिषद सावनेर, नगर परिषद हायस्कूल चे मुख्याध्यापक,शीक्षकवु्ंद,सावनेर पोलीस प्रशासन व इतर समाजसेवी तर केळवद येथे भीमरावबापू देशमुख शिक्षण संस्था येथे समाजसेवी उदय देशमुख,सोनु रावसाहेब,सतीश लेकुरवाळे व त्यांचे सहयोगी युवक मंडळी व्दारे पायी आपल्या गतंव्यावर पोहचणार्या कामगारांन करीता भोजन,आवास व वैद्यकीय सेवा पुरवून माणूसकी व सामाजिक बांधीलकी जपल्या जात आहे.*
*सदर निवारा केन्द्रास नागपूर जिल्हा ग्रामीण चे पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी भेट देऊण सदर सामाजिक संस्थांचे उत्साहवर्धन करुण येथे राह असलैल्या कामगार व त्याच्या परिवारास आश्वस्त केले की आपण येथेच राहा पोलीस प्रशासन,महाराष्ट्र शासन व समाजसेवी संस्था आपणास कोणत्याही गोष्टी ची उणीव भासु देनार नाही असे ठैस आश्वासन देऊण या कठीण प्रसंगी आम्ही आपल्या सोबत आहो चा परिचय दीला धन्य ते अधिकारी कर्मचारी,समाजसेवी व धन्य त्या सामाजिक संस्था अश्या दानवीर व कर्तव्यदक्ष संस्थांना महाराष्ट्र न्यूज मीडिया तर्फे मानाचा मुजरा….*