*उपविभागात शिधा वाटपाचे नियोजन*
*शासकीय स्वस्त धान्य विक्रेतांना योग्य नियोजनाच्या सुचना*
*पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत प्रती व्यक्ती 5 Kg तांदूळ पुढील तीन महिने मोफत वितरण*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधी सुरज सेलकर/दिनेश चौरसीया सावनेर*
*सावनेरः उपविभागीय कार्यालया अंतर्गत सावनेर तालुक्यातील सर्व 117 शासकीय स्वस्त धान्य विक्रेत्यांची सामुहीक बैठक तहसील कार्यांलयाच्या भव्य प्रांगणात मा.उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,तहसीलदार दिपक कारंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यात कोरोना वायरस प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनस्तरावर करण्यात येत असलेल्या उपाययोजना सह लाँकडाऊन परिस्थितीत नागरिकांना अन्न धान्याची कमतरता भासू नये याकरिता दिशानिर्देश तसेच राज्य व केन्द्र शासनाव्दारे निर्गमीत सुचनांनूसार वेळेत शिधा वाटप करण्याच्या सुचना पुढील प्रमाणे देण्यात आल्या.*
*शासकीय शिधा वितरण करणार्या सर्व दुकानदारांना एप्रील महीन्याचे शिधा वाटपा सोबतच पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचे प्रती व्यक्ती पाच कीलो तांदूळ अंतोदय व अन्न सुरक्षा या योजनेत समाविष्ट प्रत्येक लाभार्थ्यांना तीन महिने योग्य रीतीने वितरण करणे,अन्न वितरण करतांना गर्दी होऊ नये तसेच सुरक्षित अंतर रहावे,दुकानातील दर्शनीय स्थळी दुकानातील अन्न धान्याचा साठा ठळक अक्षरात नमूद ठेवने आदी महत्वपूर्ण सुचना उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे,तहसीलदार दिपक कारंडे यांनी देऊन तालुक्यातील 41 हजार शिधापत्रक धारकांचे योग्य नियोजन करुण वेळेवर सर्व नागरिकांना शासकीय अन्न पुरवठा सोबतच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या सोई उपलब्ध व्हाव्यात असे दिशानिर्देश देण्यात आले*
*याप्रसंगी नायब तहसीलदार चैताली दराडे,पुरवठा निरीक्षण अधिकारी वसुधा रघताटे,पुरवठा निरीक्षक स्मिता नायगावकर,नायब नाझर जयसींग राठोर सोबतच तहसील कार्यालयाचे संबंधित कर्मचारी उपस्थित होते.सदर नीयोजन बैठकीत तालुक्यातील उपस्थित सर्व शासकीय स्वस्थ धान्य विक्रेत्यांनी उपस्थितराहून नेहमीप्रमाणे शासनाने दिलेल्या दिशानिर्देशाचे काटोकर पणे पालन करण्याचे व कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लाँकडाऊन व संचारबंदी मुळे उदभवलेल्या परिस्थितीत संपूर्ण दुकानदार शासनाच्या सोबत असल्याचा जणुकाही परिचय दिला*