*घर दार झाले दिपमालांनी प्रकाशमान*
*पथदिवे सुरु असल्याने आनंदात पडले विर्जन*
सावनेर प्रतिनिधि- सूरज सेलकर व दिनेश चौरासिया
सावनेर– *देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश वासीयांना आव्हान करुण 5 एप्रील ला रात्री नऊ वाजता घरातील लाईटे बंद करुण घरा-दार सह गँलरीत दिवे,पणत्या अथवा मोबाईल चा टार्च लावु कीमान नऊ मीनटे घराबाहेर सुरक्षित अंतरावर उभे राहण्याचे आव्हान केले होते*
*त्या अनुशांगाने देश वासीयात केव्हा.नऊ वाजतात व आम्ही आपल्या लाडल्या.पंतप्रधानाचे आव्हान पुर्ण करतो याची जनू काही होड लागली होती व नऊ वाजन्याआधी तयार करुण ठेवेले दिवे पणत्या जळून लखलखाट होऊण देशावर आलेल्या कोरोना वायरस च्या सावटात संपूर्ण देश एक आहे चा जणूकाही नागरिकांनी परिचय देत चिमचकल्यांनी तर चक्क गो कोराना गो चा नाद करायला सुरुवात केली*
*घरातील पुर्ण दिवे विझवून बाहेर पडणार्या नागरिकांना रस्त्यावरील पथदिवे सुरु असल्याने दिपमालांनी प्रकाशमय काळोखाचा आनंद लुटता आला नाही हे विशेष…*