*”बोले तैसा चाले”*
*यालाच म्हणतात वचन पुर्तता*
*दुग्ध विकास मंत्री सुनील केदारांच्या प्रयत्नानी दोन दिवसात कारखाना सुरु,दुग्ध उत्पादकांना मोठा दिलासा*
*विशेष प्रतिनिधी भंडारा*
भंडारा– विदर्भातील दूध उत्पादक जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा. लॉकडॉउन मुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला खरेदी करण्यास कोणी तैयार नव्हते. म्हणून दुग्धविकास मंत्री म्हणून शासन शेतकऱ्यांचे दूध विकत घेणार व त्या दुधाची भूकटी बनवून त्याची विक्री करणार. त्याच धर्तीवर भंडारा येथील बंद पडलेल्या दूध भूकटी प्रकल्पाला दोन दिवसांपूर्वी विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष नाना पटोले यांच्या सोबत भेट दिली. व तेथिल अधिकऱ्यांना तात्काळ प्रकल्प चालू करण्याचे निर्देश दिले.बंद पडलेल्या मशिनरी करिता लागणारे साहित्य तात्काळ उपलब्ध करून दिले. व आज बोलल्याप्रमाणे दोनच दिवसात दूध भुकटी प्रकल्पाचे उदघाटन विधानसभेचे अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या हस्ते करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.