*पाटणसावंगीत आरोग्य, स्वच्छता कर्मचारी व पोलिसांचा गौरव*

पाटणसावंगीत आरोग्य, स्वच्छता कर्मचारी व पोलिसांचा गौरव

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले सोबत सूरज सेलकर व दिनेश चौरासिया

 

पाटणसावंगी : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. याच धर्तीवर काही ठिकाणं सीलही करण्यात आली आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग पाहता, सर्व नागरिकांना घरातच राहून या विषाणूचा संसर्ग टाळण्याचं आवाहन खुद्द पंतप्रधानांनीही केलं. 
अत्यावश्यक सेवा आणि स्वच्छता सुविधा पाहता इतर सर्व कामंही ठप्प झाली आहेत. या साऱ्यामध्ये देशभरातील विविध ठिकाणी सर्वसामान्य नागरिक जिथे सुरक्षेच्या कारणास्तव घरांमध्ये आहेत, तिथेच आपल्या कर्तव्याप्रती दक्ष असणारे पोलीस कर्मचारी,स्वछता कर्मचारी मात्र गाव स्वच्छ व सुरक्षित करण्याचं काम अविरतपणे करत आहेत. त्याचप्रमाणे वैद्यकीय व आरोग्य कर्मचारी अविरत सेवा देत आहे.


समाजासाठी झटणाऱ्या याच पोलीस,आरोग्य व सफाई कर्मचाऱ्यांप्रती आभाराची भावना व्यक्त करत स्थानिक पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस चौकी, ग्रामपंचायत कार्यालय येथे जाऊन गुलाबाचे पुष्प देऊन पोलीस,आरोग्य व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर, संदीप नागरे, हेमराज कोल्हे, वैद्यकीय अधिकारी डॉ इशरत शेख, राजेश पडोळे, मधुकर वैरागडे, संजय चौबे, कीर्ती गुल्हाने, तृप्ती नागपुरे, अतुल महंत, संगीता उज्जेनवार,वामन ताजने,राजेंद्र काकडे आदींचा करण्यात आला. सत्कार केलेल्या कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करत पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार किशोर ढुंडेले,विनोद वासाडे, मनोज पंकज, अनंता पडाळ, सुरज सेलकर, प्रशांत सांबारे, दिनेश चौरसिया, अक्षय चिकटे आदींनी प्रयत्न केले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …