*केळवद पोलीसांची मोठी कारवाई* *पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा तिडंगी येथील “पारधी बेड्यावरील मोहफुल दारू भट्टीवर धाड* *एकूण 15 लाख 96 हजाराचा ऐवज जप्त*

*केळवद पोलीसांची मोठी कारवाई*


पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा तिडंगी येथील “पारधी बेड्यावरील मोहफुल दारू भट्टीवर धाड

*एकूण 15 लाख 96 हजाराचा ऐवज जप्त*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत प्रतिनिधी सुरज सेलकर/दिनेश चौरसीया सावनेर*


*सावनेरः तालुक्यातील केळवद पोलीस स्टेशन तहसील सावनेर जिल्हा नागपूर येथील मौजा तिरंगी पारधी बेडा येथे मोठ्या प्रमाणात हात भट्टी लावून मुलाची गावठी दारू काढीत आहेत अशा खबरे वरून मोठ्या प्रमाणात अवैद्य हातभट्टी लावून मोहफुल दारू चा वापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर प्रतिबंध घालण्याची उद्देशांनी त्याठिकाणी केळवद पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकारी कर्मचारी यांच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई करीत दि 8 एप्रिल 2020 रोजी सकाळी 9-30 चे दरम्यान मौजा तिडंगी पारधी बेडा येथे पोहोचून धाड टाकली असता तिडंगी पारधी बेडा या ठिकाणी अवैधरित्या हातभट्टी लावून मोह फुल गावठी दारू काढताना दिसून आले दगड विटांचे चुलीवर लोखंडी ड्रम ठेवून नळीद्वारे मोहफुल दारू काढण्याची रनिंग भक्ति आढळून आली तसेच बेड्या वरील घरांचे आजूबाजूला निळ्या रंगाच्या दोनशे लिटरच्या प्लास्टिक ड्रमामध्ये मोहफुल रसायन सडवा भरलेला दिसला दारू काढणारे आरोपी पोलिसांना पाहून जंगलाच्या दिशेने पळून गेले पंचा समक्ष परिसराची पाहणी करून*

*80 नग निळ्या रंगाचे प्लास्टिक ड्रममध्ये दोनशे लिटर महसूल रसायन सर्व एकूण सोळा हजार लिटर किंमत 80 रुपये प्रति लिटर प्रमाणे एकूण किम्मत बारा लाख 80 हजार रुपये,पाचशे लिटर तयार मोहफुल दारू किंमत 100 रुपये प्रति किलोप्रमाणे एकूण कीमती50000/हजार रुपये,आठशे किलो मोहफुल किंमत 80 रुपये प्रति किलो प्रमाणे एकूण किंमत 64 हजार रुपये,80निळ्या रंगाचे खाली ड्रम प्रत्येकी किंमत 800 रुपये प्रति किलोप्रमाणे एकूण किमती 64 हजार रुपये, 8 नग लोखंडी ड्रम ज्यात उघडते मोह फुल रसायने भरलेले प्रत्येकी 150 लिटर प्रमाणे असा एकूण बाराशे लिटर मोह फूल रसायन किमती 80 रुपये प्रमाणे एकूण किमती छान 96000/रुपये, 8 नग लोखंडी खाली ड्रम प्रत्येकी किंमत एक हजार रुपये प्रमाणे एकूण किमती आठ हजार रुपये,आठ टन जळाऊ लाकूड किमती वीस हजार रुपये,गुड आठ बॅग प्रत्येकी पंधरा किलो एकूण 120 किलो किंमत 50 रुपये प्रमाणे एकूण किमती 6 हजार रुपये,इतर दारू काढण्याचे साहित्य प्लास्टिक पाईप जर्मन तसली एकूण किमती आठ हजार रुपये असा एकूण1596000/ रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने पंचाच्या समक्ष पंचनामा कारवाई करण्यात आली*
*घटनास्थळी लोखंडी ड्रम प्लास्टिक ड्रम तोडफोड करून मोहफुल रसायन व तयार महसूल दारू घटनास्थळी नाश करण्यात आला प्लास्टिक ड्रम पुढील कारवाई करिता राज्य उत्पादन शुल्क यांच्या ताब्यात देण्यात आले आहे*


*जप्त माला पैकी एका काचेच्या लहान 180 एम एल शिशी मध्ये मोह फुल दारू तसेच मोह फुल सडवा सीए सॅम्पल करिता वेगवेगळ्या सील करून पंचा समक्ष जप्त केला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी नामे चंद्रपाल संतोष राजपूत महिपाल,किशोर मारवाडी,दीपक संतोष राजपूत,संदीप दिलीप राजपूत, जगतपाल किशोर मारवाडी, अविनाश संजय पवार,दिलीप संतोष राजपूत,संदीप अनिल राजपूत,भागवत भेंडे,अमित चंद्रपल राजपूत सर्व राहणार पारधी बेडा यांनी अवैद्य रित्या विनापरवाना मोह फुल दारू गाळण्याचे साहित्य बाळगून हातभट्टी चालवून मोह फूल दारू तयार करताना मिळून आल्याने नमूद आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन केळवद अपराध क्रमांक 66/2020 कलम 65 बीसी ई एफ महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे*

*सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण,श्रीमती मोनिका राऊत अप्पर पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनात सुरेश मट्टामी ठाणेदार पोलीस स्टेशन केळवद यांचे नेतृत्वात सपोनि पंकज वाघोळे पो हवा अरुण गुंठे, सुभाष रुडे,रामराव पवार,भूमेश्वर दाखवा नाकोशी,रवींद्र चटप पंकज ठाकूर,पो शी अंकित ठाकरे,सचिन येळेकर,धोंडुतात्या देवकते सह होमगार्ड पथकानी भाग घेतला*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …